ETV Bharat / state

प्रताप सरनाइक यांची 11 करोडची संपत्ती ईडी ने केली जप्त - Shiv Sena MLA Pratap Saranaik

ईडीने शिवसेना आमदार तथा प्रवक्ते प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांची 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली (assets worth Rs 11 crore seized by ED) आहे. सरनाईक यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि इतर मालमत्ता जप्त केल्या असून याची किंमत 11.35 कोटी आहे. ईडीने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या जवळच्या व्यक्तीची मालमत्ता जप्त केल्याने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे

प्रताप सरनाइक
author img

By

Published : Mar 25, 2022, 1:00 PM IST

Updated : Mar 25, 2022, 2:28 PM IST

मुंबई: ठाण्यातल्या पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेले छाबय्या विहंग गार्डन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंड माफ केला. सरनाईक यांच्या कंपनीचा दंड माफ प्रकरणावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता. तरीही राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे या विरोधात आज ठाण्यात भाजपने विरोध केला होता.

प्रताप सरनाईक यांची गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यानंतर आता धडक कारवाई करत ठाण्यातील 02 फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे, एनएसईएल घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग 2002 च्या तरतुदींनुसार 11.35 कोटी रुपये मुल्य आहे. ईडीने 2013 च्या गुन्ह्याच्या आधारे 30.09.2013 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी याप्रकरणात त्यांचे संचालक आणि प्रमुख अधिकारी तसेच 25 डिफॉल्टर आणि इतरांवर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात, आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करत गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे व बनावट खाती तयार केली. या प्रकरणात विश्वासार्हतेचा भंग केला.

पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले की विविध गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे कर्जदार एनएसईएलच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक थकीत कर्जाची परतफेड आणि इतर ठिकाणी वळवले होते. तपासात पुढे असे दिसून आले की डिफॉल्टर सदस्यांपैकी एक असलेल्या आस्था ग्रुपचे 242.66 कोटी रुपये कंपनीकडे आहेत. 2012-13 च्या कालावधीत मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प एलएलपीचे 21.74 कोटी एकूण रक्कमेपैकी रु. 21.74 कोटी मेसर्स विहंग आस्था गृहनिर्माण प्रकल्प LLP कडून प्राप्त झाले. रुपये 11.35 कोटी मेसर्स विहंग एंटरप्रायझेस आणि मेसर्स विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड, दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली आहेत.

मनी ट्रेल, छाननी आणि ओळखपत्राच्या आधारावर ठाणे, महाराष्ट्रातील 02 फ्लॅट्स आणि जमिनीच्या पार्सलसह प्रताप सरनाईक यांच्याकडे 11.35 कोटी रुपये, 2002 अंतर्गत 11.35 कोटी तात्पुरते जोडले गेले आहेत. इतर उर्वरित रक्कम योगेश देशमुख याला आस्था ग्रुपकडून 10.50 कोटी रुपये दिले गेले. ही रक्कम 10.50 कोटी आधीच संलग्न केले गेले आहेत आणि त्याची न्यायिक प्राधिकरणाने पुष्टी केली आहे. या प्रकरणात पूर्वीची मालमत्ता 3242.67 कोटी संलग्न करण्यात आली आहेत. या प्रकरणात एकूण संलग्न मालमत्तेचे मूल्य आता 3254.02 कोटी झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांची राजकीय कारकीर्द ठाण्यातून सुरू झाली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले. ते सलग दोनदा नगरसेवक राहिले आहेत. या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जोडलेले होते. 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 2009 साली माजिवडा-ओवळा या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 2014 आणि 2019 मध्ये देखील ते आमदार म्हणून निवडून आले.

आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या ठाण्यातून नगरसेविका आहेत. प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा पूर्वेश सरनाईक हा युवासेनेच्या सचिव पदावर आहे तसेच ठाण्यातून नगरसेवकही आहे. लहान मुलगा विहंग सरनाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदावर कार्यरत आहे. राजकारणासहित सरनाईक कुटुंब हॉटेल व्यवसाय आणि बांधकाम व्यवसायात आहेत. प्रताप सरनाईक यांनी एन.एस.ई.एल मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला होता. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती. यात आता संपत्ती जप्त केल्याची कारवाई झाली आहे.

Last Updated : Mar 25, 2022, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.