ETV Bharat / state

पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष; प्रणिती शिंदेंची संधी दुसऱ्यांदा हुकली - प्रणिती शिंदे बातमी

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज(बंटी) पाटील आणि विश्वजीत कदम यांचा समावेश आहे.

praniti-shinde-not-to-be-sworn-in-as-minister-in-maharashtra-cabinet
पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:49 AM IST

Updated : Dec 30, 2019, 11:32 AM IST

मुंबई- महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (सोमवारी) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या यादीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले आहे. चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल, असे संगण्यात आले आहे. तर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांची दुसऱ्यांदा संधी हुकली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा- CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत अशोक चव्हाण, के सी पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज(बंटी) पाटील आणि विश्वजीत कदम यांचा समावेश आहे. या यादीत विदर्भातून यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबईतून अस्लमम शेख यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातून के सी पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. विश्वजित कदम यांचीही वर्णी मंत्रीपदी लागली आहे. सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांची संधी मात्र दुसऱ्यांदा हुकली आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाही मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरले होते. तेव्हाही त्यांना संधी मिळाली नाही. तसेच आताच्या महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळातही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांची संधी हुकल्याचे दिसत आहे. ऐनवेळी नावे बदलून काँग्रेसने अनेकांना धक्का दिल्याचेही भूतकाळात उदाहरणे आहेत. त्यामुळे शिंदे अजूनही आशावादी आहेत.

दरम्यान, २४ डिसेंबरला ईटीव्ही भारतने पृथ्वीराज यांना मंत्रीपद, प्रदेशाध्यक्ष पद याबाबत विचारे होत. मात्र, याबाब मला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

Intro:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष तर प्रणिती शिंदे यांची संधी दुसऱ्यांदा हुकली...

मुंबई 30

राज्य मंत्रिमंडळाच्या पहिलाच मोठा विस्तार होत असून या मंत्री मंडळात काँग्रेसच्या यादीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले आहे. चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल असे संगण्यात येत असून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची पुत्री प्रणिती शिंदे यांची दुसऱ्यांदा संधी हुकली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत अनुक्रमे

अशोक चव्हाण
के सी पडवी
विजय वडेट्टीवार
अमित देशमुख
सुनिल केदार
यशोमती ठाकूर
वर्षा गायकवाड
अस्लम शेख
सतेज(बंटी) पाटील आणि
विश्वजीत कदम यांची नावं आहेत. या यादीत विदर्भातून यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांना संधी देण्यात आली आहे. तर मुंबई तुन अस्लमम शेख यांना मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. उत्तर महाराष्ट्रातून के सी पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. विश्वजित कदम यांचीही वर्णी मंत्रीपदी लागली आहे. सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांची संधी दुसऱ्यांदा हुकली आहे. अशोक चव्हाण यामच्या मंत्री मंडळात ही स्थान मिळावे यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरले होते. तेव्हा ही त्यांना संधी मिळाली नाही. तसेच आताच्या महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळात ही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र त्यांची संधी हुकल्याचे दिसत आहे. मात्र येन वेळी नावे बदलून काँग्रेसने अनेकांना धक्का दिल्याचे ही भूतकाळात उदाहरणे आहेत, त्यामुळे शिंदे अजूनही आशावादी आहेत. Body:.....Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.