मुंबई - पोलीस दलातून राजकारणाकडे मार्चा वळवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. "गेली 30 वर्षे एकाच कुटुंबाची सत्ता नालासोपारामध्ये असल्याने तिथल्या मतदारांना आता बदल हवा आहे. राजकीय दहशतवादाचा एन्काऊंटर करण्यासाठी लढताेय," असे नालासोपाराचे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी एबी फॉर्म घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा- रणधुमाळी विधानसभेची : अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल
3 तारखेला एबी फॉर्म भरणार असल्याचे सांगत प्रदीप शर्मा यांनी जिंकण्याचा विश्वास देखील व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फॉर्म दिला तेव्हा एक्ससायटेड होतो. मी पोलीस सेवेत असताना दाऊद इब्राहिमशी पंगा घेतला होता. त्यामुळे मला कोणाचीही भीती वाटत नसल्याचे ते म्हणाले. नालासाेपाऱ्यात अनेक प्रश्न आहेत. हितेंद्र ठाकूरांनीच मैदानात उतरावे, असे खुले आव्हान प्रदीप शर्मा यांनी केले. त्यामुळे नालासोपारा येथील निवडणूक रंगतदार होणार हे नक्की.