मुंबई : मुंबईतील मंत्रालय म्हणजे अतिशय संवेदनशील ठिकाण. हा परिसर तसा नेहमी गजबजलेला असतो. सायंकाळी सहा सातच्या सुमारास या परिसरात असलेल्या अनेक कार्यालयामधील नागरिक घराकडे जाण्यासाठी धावपळीत असतात. मात्र, याच मंत्रालय परिसराबाहेर असलेल्या महर्षी कर्वे रस्त्यावरील बत्ती गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. विशेषतः कार्यालय सुटण्याच्या वेळेसच ही लाईट गेल्याने जे चाकरमाने कार्यालयातून आपल्या घराकडे निघाले होते, त्यांना या काळोखातून चर्चगेट स्टेशन गाठावे लागले.
खांबांवरील दिवे बंद: महर्षी कर्वे रोड आणि ओवल मैदाना समोरील हा रस्ता आहे. जे ते रस्त्यावरील खांबांवरील दिवे बंद झाल्याने चोरटे गैरफायदा घेऊ शकतात. बराच वेळेपासून मंत्रालय परिसरातील असलेल्या रस्त्यावर लाईट गेल्याने, नागरिक आपल्या मोबाईल मधील टॉर्च लावून चालताना दिसन होते. रस्त्यात असलेले खाचखळगे यांचा सामना करत वयोवृद्ध व्यक्ती अंधारामुळे धडपडत चालत होते. त्याचप्रमाणे अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आणि समाजकंटक नागरिकांना त्रास देऊ शकतात. त्याचप्रमाणे अति संवेदनशील असलेल्या मंत्रालय परिसर देखील काळोखात बुडालेला दिसत होता.
मंत्रालयाच्या इमारतीत विद्युत पुरवठा सूरू: महर्षी कर्वे रोडवर असलेल्या रहिवासी इमारतीत आणि मंत्रालयाच्या इमारतीत देखील विद्युत पुरवठा सूरू असल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खांबांवरील दिवे मात्र बंद होते. हा विद्युत पुरवठा बेस्टकडून केला जातो. त्यामुळे या बत्ती गुल अवस्थेबाबत बेस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मनोहर गोसावी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी मंत्रालयासमोरील परिसरात रस्त्यावरील विद्युत पुरवठा बंद झाला प्रकरणी अद्याप माहिती नसल्याचे सांगितले. तसेच या आधीही मंत्रिडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली होती. वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आता मात्र मंत्रालयाच्या इमारतीत दिवे चालू होते, परंतु मंत्रालयाच्या इमारतीत बाहेर अंधार दिसून येत होता.