मुंबई - शहरासह आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी सुद्धा साचल्याचे पहायला मिळाले. गेल्या चार-पाच दिवसांत इतका मुसळधार पाऊस झाला, की यामुळे मुंबईतील पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. पवई तलाव गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधी भरून वाहू लागला आहे.
24 दिवस आधीच भरला तलाव
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव. 12 जून 2021 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा तलाव पूर्ण भरून वाहू लागला. पवई तलाव गेल्या वर्षी 5 जुलै 2020 रोजी पहाटे 6 वाजताच्या सुमारास तलाव पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे 24 दिवस आधी भरून वाहू लागला आहे.