ETV Bharat / state

शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य वाटपाला स्थगित द्या - भाजपा शिक्षक सेल

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून (सोमवार) राज्यशासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ४ जणांच्या वर कुणालाही एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. अशातच शालेय पोषण आहार अंतर्गत पालकांना धान्य वाटप करण्यासाठी शाळांपर्यंत धान्य पोहचले आहे. अनेक शाळांनी धान्य वाटपाचे नियोजन केले आहे.

भाजपा मागणी
भाजपा मागणी
author img

By

Published : Apr 5, 2021, 10:05 PM IST

मुंबई - एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे शालेय पोषण आहाराच्या अंतर्गत राज्यभर धान्य वाटपाचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे शाळांमध्ये पालकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 30 एप्रिल पर्यत शालेय पोषण आहार अंतर्गत धान्य वाटप बंद करा. अशी मागणी भाजपा शिक्षक सेलचे प्रदेश सह संयोजक अनिल बोरणारे यांनी केली आहे.

भाजपा शिक्षक सेल

कोरोना बाधित होण्याची भीती
भाजपा शिक्षक सेलचे प्रदेश सह संयोजक अनिल बोरणारे यांनी सांगितले आहे की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५७ हजारावर पोहचली असून मुंबई, ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात रुग्णांची संख्या चिंताजनक वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून (सोमवार) राज्यशासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ४ जणांच्या वर एकत्र जमण्यास मनाई करण्यात आले आहे. अशातच शालेय पोषण आहार अंतर्गत पालकांना धान्य वाटप करण्यासाठी शाळांपर्यंत धान्य पोहचले आहे. अनेक शाळांनी धान्य वाटपाचे नियोजन केले आहे. यामुळे शाळांमध्ये पालकांची गर्दी उसळून कोरोना बाधित होण्याची भीती अनेक शाळांचे मुख्याध्यापक व्यक्त करीत आहे, असेही बोरणारे यांनी सांगितले आहे.

भाजपा शिक्षक सेलकडून मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून ३० एप्रिल पर्यंत धान्य वाटपाचा कार्यक्रम तत्काळ स्थगित करण्याची विनंती शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या पोषण आहारी अंतर्गत धान्य वाटप कार्यक्रम घ्यावे, अशी मागणी भाजपा शिक्षक सेलकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा-राज्यातील आणखी चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल - किरीट सोमौया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.