ETV Bharat / state

मोहन देलकर आत्महत्या प्रकरण; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता - मोहन देलकर लेटेस्ट न्यूज

शविविच्छेदनाच्या अहवालानंतर मोहन देलकर यांचा मृत्यू गळफास घेऊन झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या सुसाइड नोटमध्ये लिहिलेला मजकूरानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो.

मोहन देलकर
मोहन देलकर
author img

By

Published : Feb 24, 2021, 4:36 PM IST

मुंबई- दादरा-नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांनी मुंबईतील सी ग्रीन या हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांना सुरुवातीला ६ पानांची गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड मिळाल्यानंतर मोहन देलकर यांच्या डायरीतून मुंबई पोलिसांना आणखीन काही सुसाईड नोटची पाने मिळालेली आहे. आतापर्यंत पंधरा पानांची सुसाईड नोट मुंबई पोलिसांना मिळालेली असून गुजराती भाषेत असलेली ही सुसाईड नोट मुंबई पोलिसांकडून तपासली जात आहे.

सुसाईड नोटमधील हस्ताक्षराची चाचपनी
संबंधित १५ पानांची सोसाइट नोटमधील हस्ताक्षर हे दिगवंत खासदार मोहन देलकर यांच्याच हस्ताक्षरात आहे का ? याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेतली जात आहे . मोहन देलकर यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्यानंतर त्यांचे शव त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे. मोहन देलकर यांच्या आत्महत्या संदर्भात अद्याप त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलेला नाही. सुसाईड नोटमध्ये मोहन देलकर यांनी दादरा - नगर हवेली मधल्या काही वरिष्ठ आयपीएस , आएएस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या अधिकार्‍यांमध्ये व मोहन देलकर यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता . मोहन देलकर यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांच्यावर विनाकारण गुन्हे नोंदवले जात होते. यामधील काही अधिकारी मोहन देलकर यांना त्रास देत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

काही मजकुराबद्दल गोपनीयता
शविविच्छेदनाच्या अहवालानंतर मोहन देलकर यांचा मृत्यू गळफास घेऊन झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे . मात्र, या सुसाइड नोटमध्ये लिहिलेला मजकूरानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, तो दाखल करण्याअगोदर योग्य तपास होणे गरजेचे असल्यामुळे फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेतली जात आहे. या सुसाईड नोटमधल्या आणखीन काही मजकुराबद्दलची गोपनीयता पोलिसांनी बाळगली असून यासंदर्भात अधिक काही बोलण्यास नकार दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.