मुंबई - दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात, महाराष्ट्रातला शेतकरी सशक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या माध्यमातून एकटवला असून नाशिकहून निघालेले हजारो शेतकरी काल (रविवार) मुंबईत धडकले. आज दुपारनंतर शेतकरी राज्यपालांची भेट घेऊन केंद्राने पारित केलेले शेतकरी कायदे रद्द करण्याचे निवेदन राज्यपालांना देणार आहेत.
शेतकरी-पोलीस संघर्ष होण्याची शक्यता
जवळपास 10 हजाराच्यावर शेतकरी आझाद मैदानात जमा झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी राजभवनाच्या दिशेने निघाले तर मुंबईतही ट्रॉफिकची कोंडी होईल. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ शकतो. म्हणून पोलीस शेतकऱ्यांना आझाद मैदानाच्या बाहेर पडू देणार नसल्याची माहिती मिळत आहे. जर शेतकऱ्यांनी आझाद मैदानाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा - किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी कसारा घाट उतरले पायी
हेही वाचा - शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित