ETV Bharat / state

दोन दिवसांत दहावी मूल्यांकनासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता..?

author img

By

Published : May 22, 2021, 9:03 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल तयार केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे याबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल तयार केल्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. परीक्षा रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला असला तरी निकालाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. 'तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का, असे खडे बोल उच्च न्यायलयाने राज्य सरकारला सुनावले आहे. त्यानंतर राज्य सरकराच्या दहावी मूल्यांकनाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सादर करून काही दिवस उलटून गेले तरी अंतिम निर्णय होत नव्हता. अखेर उच्च न्यायलयाने राज्य सरकारला झोपल्यानंतर राज्य सरकारकडून येत्या दोन दिवसांत निर्णय होऊ शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

असे होणार मूल्यमापन

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते का हे पाहण्यासाठी याबाबतचा साप्ताहिक अहवाल शाळांकडून मागविला होता. त्यानुसार राज्यातील 25 हजार 927 शाळांपैकी 12 हजार 931 शाळांनी दिलेल्या माहितीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे विविध स्तरावर ऑनलाइन मूल्यांकन झाल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये ऑनलाइन, व्हॉट्सअ‌ॅप, ऑनलाइन तोंडी परीक्षा, ऑफलाइन परीक्षा, घरी पेपर सोडविण्यास देणे, कार्यपुस्तिका देणे आणि इतर अशा विविध पर्यायांचा वापर करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. याचबरोबर शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या सर्वेक्षणात 82.84 टक्के म्हणजे 17 हजार 487 शाळंतर्गत मूल्यमापनासाठी तयार असल्याचे समोर आले आहे. याचाच आधार घेत अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मूल्यांकन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - 'टीडीआर ऑनलाइन करण्याचा मुंबई मनपाचा विचार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.