मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा पॉझेटिव्ह रुग्ण आढळला असून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. सदर रुग्ण अमेरिकेतून कल्याण पूर्व परिसरात त्याच्या घरी आला होता. मात्र, तो आजारी पडल्याने व कोरोनाचे लक्षण दिसून आल्याने त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
रुग्णाला ११ मार्चला ताप, खोकला, सर्दी झाल्याने त्याला कल्याणच्या रुख्मीणी बाई रुग्णालयात १२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता, कोरोनाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या रुग्णाला पुढील औषधोपचारार्थ कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णाच्या अन्य कुटुंब सदस्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. लवंगारे यांनी दिली आहे.
हेही वाचा- अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, सभागृहात प्रचंड गदारोळ