ETV Bharat / state

Supriya Sule : राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे? कसा आहे सुळे यांचा कॅलिफोर्निया ते खासदारकीपर्यंतचा प्रवास? - MP Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रिया सुळे या अभ्यासू नेतृत्व असून बारामती मतदारसंघातून त्या सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. जाणून घेऊया सुप्रिया यांचा राजकीय प्रवास..

Supriya Sule
Supriya Sule
author img

By

Published : May 3, 2023, 9:40 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षामध्ये खळबळ माजली आहे. शरद पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? याबाबत चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्यानंतर अजित पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवली जाणार का सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल का किंवा छगन भुजबळ यांच्याकडे सूत्रे दिली जातील काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र या सर्वात सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आणि सर्वमान्य होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सुप्रिया सुळे? : सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचे शिक्षण पुण्यातील नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूल मध्ये झाले. बारावीनंतर सुप्रिया सुळे यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पवार मुख्यमंत्री असताना सुप्रिया मात्र, बसने कॉलेजला जात होत्या. त्यांना दररोज दहा रुपय पॉकेट मधून दिले जायचे.

सुप्रिया पवार यांचा विवाह? : महाविद्यालयीन जीवनातच सुप्रिया पवार यांचा सदानंद सुळे यांच्याशी कौटुंबिक कार्यक्रमात संपर्क आला. या ओळखीनंतर सुप्रिया यांनी सदानंद सुळे यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखराव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने या दोघांचे लग्न करण्यात आले. लग्नानंतर सुप्रिया सुळे आपल्या नवऱ्यासोबत परदेशात गेल्या. परदेशात असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातून जलप्रदूषण या विषयात पदव्युत्तर पदविका धारण केली. त्या काही काळ सिंगापूर आणि इंडोनेशियातील शहरांमध्ये राहिल्या. त्यानंतर त्या भारतात परतल्या. सुप्रिया सुळे यांना रेवती आणि विजय अशी दोन अपत्ये आहेत.

राजकारणात सुप्रियाताईंचा प्रवेश : भारतात परतल्यानंतर 2006 मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, यावेळी साडेतीन लाख मतांनी त्या विजयी झाल्या. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभांच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया यांनी विजय मिळवला. सोळाव्या लोकसभेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुप्रिया एकमेव खासदार होत्या. त्यांनी पाच वर्षात संसदेत अकराशे 76 प्रश्न उपस्थित केले होते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेस : महिलांनी अधिकाधिक राजकारणात यावे यासाठी सुप्रियाताईंनी 2012 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस हे व्यासपीठ निर्माण केले. या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण महिलांना राजकारणात येण्याची संधी दिली.

अध्यक्ष पदाची सूत्रे येण्याची शक्यता : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर नेमलेली समिती आता अध्यक्षपदी कोणाची निवड करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष आहे ते सुप्रिया सुळे यांच्याकडे. पवारांचे उत्तर अधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे लक्ष असून सुप्रिया सुळे यांची निवड होण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांची निवड झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतमतांतरे होऊन पक्ष फुटण्याची भीती आहे. तर, छगन भुजबळ यांचे वय पाहता त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवणे सध्या तरी पक्षाला संयुक्त वाटत नसावे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर सर्वत्र चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.