ETV Bharat / state

'मुंबईतील धोकादायक टेकड्यांवरील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी धोरणाची गरज' - अनिल गलगली

मुंबईत 18 जुलै रोजी पहाटे तीन ठिकाणी दरडी आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वत्र अशा घटनांचे सत्र सुरूच आहे. हे पाहता पुन्हा मुंबईत अशी घटना होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिका व राज्य सरकारने टेकड्यांवर राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

'Policy needed to rehabilitate people on dangerous hills in Mumbai'
धोकादायक टेकड्यांवरील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी धोरणाची गरज'
author img

By

Published : Jul 25, 2021, 9:26 AM IST

मुंबई - मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने रविवारी 18 जुलै रोजी पहाटे तीन ठिकाणी दरडी आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने रायगडच्या महाड येथील तळई गावात डोंगर कोसळून शुक्रवारी (23 जुलै) 42 जणांचा मृत्यू झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा दुर्घटना झाल्या आहेत. अशा घटना मुंबईमध्ये पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिका व राज्य सरकारने टेकड्यांवर राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तर धोक्याची ठिकाणे असलेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाते. कायम स्वरूपी स्थलांतर करण्यासाठी उपायोजना करता येईल अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धोकादायक टेकड्यांवरील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी धोरणाची गरज

मुंबईतील 257 ठिकाण धोकादायक म्हणून घोषित -

मुंबईत रविवारी 18 जुलैला पहाटे वाशी नाका चेंबूर, सूर्या नगर विक्रोळी, मुलुंड या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेत वाशी नाका चेंबूर येथे 19, सूर्या नगर विक्रोळी येथे 10 तर मुलुंड येथे 1 अशा एकूण 30 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळतील अशी 257 ठिकाण डोंगराळ भाग धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल २२ हजार झोपड्या असून त्यामध्ये राहणारे नागरिक पावसाळ्यात आपला जीव मुठीत घेऊन राहतात.

पुनर्वसनाबाबत धोरण बनवा - रवी राजा

मुंबईमधील टेकड्यांवर 5 लाख नागरिक राहतात. अर्धा किलोमीटर पर्यंत चालत जावे लागते अशा ठिकाणी नागरिकांनी घरे बांधली आहेत. 40 ते 50 वर्षाहून अधिक काळ त्याठिकाणी नागरिक राहत आहेत. अशा नागरिकांना नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपत नाही. हे दरवर्षी होत आहे, पालिका त्यांना फक्त नोटिस देते हे योग्य नाही. त्यांचे योग्य पुनर्वसन केले पाहिजे. मुंबईमधील दरडी कोसळण्याच्या जागा या राज्य सरकारच्या आणि कलेक्टरच्या अधिकारातील आहेत. टेकड्यांवर राहणाऱ्या आणि दरडी कोसळतील अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांनी धोरण बनवावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

कायमस्वरूपी धोका आहे तेथील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल -

पुन्हा पाहणी करून टेकडीवर राहणारे आणि दरडी कोसळतील अशा ठिकाणांचे हजार्ड मॅपिंग करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणांच्या जागी पुन्हा पाहणी करण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. एखादे धोक्याचे ठिकाण राहून गेले असेल. नव्याने धोकादायक ठिकाण झाले असेल, धोकादायक ठिकाण असलेल्या ठिकाणी एखादे घर पाहणीतून राहून गेले असेल अशा सर्वाना नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणे करून तेथील नागरिक पावसाळयाच्या कालावधीत इतर ठिकाणी सुरक्षित जागी आपले वास्तव्य करतील. धोका टळल्यावर त्यांना पुन्हा त्याठिकाणी राहता येईल. तातपुरत्या स्वरूपात स्थलांतर करता यावे यासाठी शाळा, पुनर्वसन केंद्र, पीएपीच्या इमारती अशा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. टेकड्या आणि दरडी कोसळतात अशा ठिकाणच्या लोकांना हलवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी धोका आहे तेथील नागरिकांचे पुनर्वसन करता येईल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

दरडीखाली 22 हजार 483 झोपड्या -

मुंबईतील 36 पैकी 25 विधानसभा मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भाग धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या 29 वर्षात दरडी कोसळून 290 लोकांचा मृत्यू झाला असून 300 लोक जखमी झाले आहेत. 22 हजार 483 झोपड्यांपैकी 9 हजार 657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. दरडी कोसळून होणारी जीवित आणि वित्त हानी रोखण्यासाठी आणि उपायोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

सरकारकडून अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन तयार नाही -

1992 ते 2021 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दहा वर्षे उलटून गेले तरी नगरविकास विभागाने त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलाच नाही, असे गलगली यांनी सांगितले.

दरवर्षी केले जाते पालिकेकडून आवाहन -

पावसाळा दरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन येणा-या पावसाच्या पाण्याच्या लोंढयामुळे, जोरदार पावसाने नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येते. स्थलांतर न करता तेथेच राहणा-या रहिवाश्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे महापालिकेकडून कळविले जाते.

या ठिकाणी दरडीखाली झोपड्या -

मलबार हिल, परेल, अँटॉप हिल, घाटकोपर मध्ये असल्फा खंडोबा टेकडी सूर्या नगर, मुलुंड हनुमान टेकडी, चेंबूर- वाशीनाका, भांडुपमध्ये केतकी पाडा खिडी पाडा, कुर्ला कसाईवाडा, चेंबूर वाशी नाका, मालाड, दिंडोशी, कांदिवली आदी 257 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीखाली झोपड्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.