मुंबई : पिटर वन मोबाईलसह पोलीस हवालदार महाले हे मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत होते. तेव्हा कालिदास नाट्य मंदिराजवळ, साधारण ५.३० वाजताच्या सुमारास महाले यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना उलटी झाली. त्यामुळे ते पीटर वन मोबाईल घेऊन अग्रवाल हॉस्पिटल येथे गेले. तेथील डॉक्टर पोलीस हवालदार रामा अर्जुन महाले यांच्यावर उपचार करीत असतानाच त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. ६.०५ वाजता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाणे येथे अपमृत्यू नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता राजावाडी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात महिला पोलिस हवालदारचा मृत्यू : गेल्या महिन्यात इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने आयोजित मुंबई संस्कृती फेस्टिव्हल २०२३ येथे बंदोबस्तासाठी असताना पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे (वय ४६) या चक्कर येऊन कोसळल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. कांचन भिसे यांना रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी मॅरेथॉनच्या बंदोबस्तावर असताना त्यांनी मुंबई मॅरेथॉनचा आंतरराष्ट्रीय ॲम्बेसिडर आणि जमैकाचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता धावपटू योहान ब्लेक याच्यासोबत घेतलेला त्यांचा सेल्फी अखेरचा ठरला होता.
संस्कृती फेस्टिव्हलला बंदोबस्तासाठी तैनात : कांचन भिसे या विशेष शाखांमध्ये कार्यरत होत्या. मुंबई मॅराथॉननंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास एमआरए मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने आयोजित मुंबई संस्कृती फेस्टिव्हलला बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्याच, दरम्यान अचानक चक्कर येऊन खाली पडल्या आणि त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या होत्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले होते.
पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू : मात्र, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने कांचन यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, सकाळी त्या मुंबई मॅरेथॉनच्या बंदोबस्तासाठी देखील तैनात होत्या. सकाळी त्यांनी योहान ब्लेकसोबत फोटो काढून स्टेट्सलाही ठेवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आता पेट्रोलिंग करत असताना रामा महाले या पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह पोलिस दलाला धक्का बसला आहे.