ETV Bharat / state

पोलीस महिलेचा सहकाऱ्यानेच केला विनयभंग, गावातही पीडितेची बदनामी - पोलीस शिपाय मुंबई

मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात एका महिला पोलिसाचा तिच्याच सहकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सहकारी पोलीस शिपायावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jun 27, 2021, 7:07 PM IST

मुंबई - रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना पोलीस कशा प्रकारे धडा शिकवतात हे आपण ऐकून असाल. मात्र, मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात एका महिला पोलिसाचा तिच्याच सहकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सहकारी पोलीस शिपायावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समज देऊनही आरोपीचे त्रास देणे बंद नाही

ठाणे जिल्ह्यात राहणारी २६ वर्षीय पीडित महिला मुंबई सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. आरोपी पोलीसही याच महिलेसोबत कार्यरत आहे. ऑक्टोबर २०२० पासून एक पोलीस शिपाई या पीडितेच्या मागावर होता. सुरवातीला पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी शिपायाने पीडितेचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता तो महिलेच्या फोन नंबरवर वारंवार मेसेज करू लागला. वेळोवेळी या महिलेने आरोपी पोलीस शिपायाला समज देऊन हे प्रकार थांबवण्याबाबत समजावले. मात्र, आरोपीने त्रास देणे काही बंद केले नाही.

पीडितेच्या गावातही आरोपीचा गोंधळ

अखेर रोजच्या या त्रासाला पीडित महिला पोलीस शिपाई पूर्णतः कंटाळली. त्यामुळेच सुट्टी घेऊन पीडिता तिच्या गावी गेली. मात्र, नशेत टूल होऊन या आरोपी पोलीस शिपायाने तिचे गावही गाठले. एवढ्यावरचं न थांबता पीडितेच्या गावी त्याने गोंधळ घातला. तिची नातेवाईंकामध्ये बदनामी केली. या संपूर्ण घटनेने संतापलेल्या पीडितेने १८ जून रोजी अखेर पोलीस ठाण्यात संबधित ओरापीविरोधात कलम ३५४,३५४ (ड), ५०० भा.द.वि कलमांसह गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर पलटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.