ETV Bharat / state

पोलिसांचा दणका; मास्क न वापरणाऱ्या 3 हजार जणांवर कारवाई - मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई

लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 8 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 20 मार्च ते 25 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 9 हजार 591 प्रकरणांत 18 हजार 767 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jun 26, 2020, 11:40 AM IST

मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क घालणे सक्तीचे आहे. मात्र, काही जण याला गांभीर्याने घेत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 8 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 20 मार्च ते 25 जून या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 9 हजार 591 प्रकरणांत 18 हजार 767 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 2 हजार 474 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 5 हजार 71 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर 11 हजार 231 आरोपी जामिनावर सुटले आहेत.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188नुसार दक्षिण मुंबईत 946, मध्य मुंबईत 2 हजार 132, पूर्व मुंबईमध्ये तब्बल 1 हजार 589, पश्चिम मुंबईत 2 हजार 16, उत्तर मुंबईत 2 हजार 908 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकाने किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.

गेल्या 24 तासांत मुंबईत 260 गुन्हे पोलिसांनी कलम 188नुसार नोंदविले असून यात सर्वाधिक 195 गुन्हे उत्तर मुंबईत नोंदविण्यात आले आहेत. या खालोखाल दक्षिण मुंबईत केवळ 1, मध्य मुंबईत 5 , पूर्व मुंबईत 49 , पश्चिम मुंबईत 10 अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

मास्क वापरणे गरजचे -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. घरच्याघरी कॉटनचे कापड, कात्री आणि शिवणयंत्राच्या किंवा शिवणकामाच्या वस्तू अशा साध्या घरगुती साधनांच्या सहाय्याने मास्क तयार करता येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.