सिंधुदुर्ग - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्थाव सिडकोने मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दि.बा.पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर तर आहेच, ते शिवसेनेतच होते. त्यांचा योग्य सन्मान करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
NaviMumbaiAirport : 'नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न 15 ऑगस्टपर्यंत निकाली काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन करू'
19:38 June 24
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्थाव सिडकोने मंजूर - विनायक राऊत
18:31 June 24
ठाणे - नवीमुंबई विमानतळाला स्वर्गीय खासदार दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आज हजारो भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावे लागते, हे दुर्दैव असल्याची खंत भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
16:21 June 24
मुंबई - नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटीलांचे नाव द्यावे, याकरिता माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांच्या नेतृत्त्वातील एका शिष्टमंडळाने सिडको भवनात जाऊन आयुक्तांना यासंदर्भातील निवेदन दिले. हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असून विमानतळाच्या नामांतराचा वाद 15 ऑगस्टपर्यंत निकाली काढावा आणि तसेच या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून देण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
14:11 June 24
नेते संजीव नाईक यांचे शिष्टमंडळ पोहोचले सिडको भवनात
नवी मुंबई - नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून नवी मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांकडून केले जात आहे. नवी मुंबईतील नेते संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ सिडको भवनात गेले आहे.
12:28 June 24
एका नावाने दोन विमानतळ असू शकत नाही - उपमहापौर जगदीश गायकवाड
नवी मुंबई - नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिगवंत दि.बा. पाटील यांचं नाव दिलं जावं यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी नवी मुंबईतील सिडको भवनाला घेराव आहे. पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून या मोर्चात भाग घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला केवळ दि.बा. पाटलांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल जावे अशीच मागणी केली आहे. यावर एकाच नावाचे दोन विमानतळ किंवा दोन शहर असू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
12:07 June 24
सिडको भवन घेराव आंदोलनासंदर्भात जागोजागी पोलीस पथक तैनात- पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे म्हणून गुरूवारी आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 5000 पेक्षा अधिक पोलीस पथक तैनात केले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीने काळजी घेण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त इथपर्यंत पोहचू नये म्हणून नवी मुंबई व परिसरातील गावांच्या हद्दी सील करण्यात आल्या आहेत. सर्वत्र बॅरीगेट्स लावण्यात आले आहेत. नवी मुंबईतील नागरिकांना घरातून बाहेर पडू नये. अगदी महत्वाचे काम असल्यास, बाहेर पडावे असे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांनी केले.
10:28 June 24
मुंबई - पुणे हायवेवर वाहतूक कोंडी
नवी मुंबईतील विमानतळाला भूमिपुत्रांचे दिगवंत नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे म्हणून गुरुवारी सिडको भवनाला घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, त्या अगोदरच मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्राफिक जाम पाहण्यास मिळत आहे. वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत असून, नागरिकांना याचा त्रास होत आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही'चे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
09:24 June 24
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको भवनासमोर पोलीस पथक तैनात
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे म्हणून गुरुवारी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वृभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दि.बा. पाटलांच्या नावासाठी आग्रही असलेले स्थानिक नागरिक आणि संघटना सिडको भवनाला घेराव घालणार आहेत. पोलिसांनी या आंदोलनाला कोरोनाच्या पार्श्वृभूमीवर परवानगी नाकारलेली आहे, मात्र तरीही आंदोलन होणार आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून शहरातील काही रस्ते बंद केले आहेत.