ETV Bharat / state

'वर्दीतील दर्दी', पोलिसांच्या पहिल्या साहित्य संम्मेलनाचे दिपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन - पोलीस साहित्य संम्मेलन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा सोहळा दिवसभर रंगणार आहे. सदैव समाजाशी निगडीत असलेल्या पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच दोन्ही घटकांमध्ये सुसंवाद घडून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे.

पोलीस साहित्य संम्मेलन
author img

By

Published : Feb 25, 2019, 12:00 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलिसांचे साहित्य संमेलन आज मुंबईत भरले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवस चालणाऱ्या या संमेलनात १७० पोलीस साहित्यिक सहभागी झाले. या संम्मेलनाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ऐरवी हातात शस्त्र, काठ्या घेवून समाजकंटक, आंदोलकांना पांगविणारे आणि नेत्यांच्या बंदोबस्तात दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या खाकी वर्दीवाल्यांकडून आता चक्क कविता, चारोळी, शौर्यगीत आणि साहित्यांवरील चर्चा, मतमतांतरे ऐकू येणार आहेत.या संम्मेलनात कॉन्स्टेबलपासून ते अप्पर महासंचालक दर्जापर्यंतचे अधिकारी आपले साहित्य, विचार मांडतील. पोलिसांची सामाजिक जाणीव समाजापर्यंत पोहोचावी आणि जनतेशी सुसंवाद साधावा, हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या पुढाकारामुळे हा अभिनव उपक्रम साकारला जात आहे. कामाच्या व्यापामुळे नित्यपणे ताणतणावाला सामोरे जावे लागते. तरीही त्यांच्यातील साहित्याविषयीच्या जाणीवा समाजासमोर मांडल्या पाहिजेत, या हेतूने पडलसगीकर यांनी त्याला तात्काळ मान्यता देत सर्व कार्यक्रमाची जबाबदारी शेखर यांच्यावर सोपविली आहे.

राज्य राखीव दलाच्या प्रमुख व अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. राज्यभरातील आजी-माजी पोलीस लेखक, कवी, विचारवंत यांच्याशी संपर्क साधत पोलिसांच्या पहिल्या संमेलनाची सुरुवात झाली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, अशोक बागवे व प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगांवकर उपस्थित आहेत.

undefined

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा सोहळा दिवसभर रंगणार आहे. सदैव समाजाशी निगडीत असलेल्या पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच दोन्ही घटकांमध्ये सुसंवाद घडून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. ऊन-पाऊस, दिवस-रात्र अशी कशाचीही पर्वा न करता १२ ते १६ तास कर्तव्यात मग्न असणाऱ्या पोलिसांच्या मनाचा हळवा कोपरा संमेलनाच्या माध्यमातून समाजासमोर येईल, असे दत्ता पडसलगीकर यावेळी म्हणाले.

पोलीस संमेलन उद्घाटन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.