मुंबई: उपनगरीय लोकल मार्गालगत असलेल्या झोपडपट्टी भागातून मोठ्याप्रमाणात लोकलमधील प्रवाशांवर फुगे मारण्याचे प्रकार होतात. काही समाजकंटकाकडून ज्वलनशील द्रव पदार्थाचा वापर करून फुगे तयार करून लोकलवर फेकले जातात. फुगे मारल्याने प्रवाशांना शारीरिक इजा होतात. यापूर्वीही डोळा, कान अशा संवेदनशील इंद्रियांना इजा झाल्याने अनेकांना अंधत्व, बहिरेपणा आला आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे लगत परिसरात उद्या रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कांजूरमार्ग, कुर्ला, गोवंडी, चेंबूर, शिवडी, वडाळा, वांद्रे माहीम येथील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . यात नागरिकांना रंगाने भरलेले फुगे मारू नका, याबाबत आवाहन (appeal to the passengers in the local not to blow balloons ) करण्यात येणार आहे.
पारंपरिक होळी सण गुरुवारी असून शुक्रवारी धुळीवंदन साजरे होत आहे. मात्र त्या आधीच हवशा, नवशांकडून रस्त्यावरून जाणाऱ्यांवर तसेच चालत्या लोकलवर रंगानी भरलेल्या पाण्याच्या पिशव्या, फुगे मारण्याचे प्रकार सुरू होतात. होळीच्या या सणाचा गालबोट लागू नये म्हणून रेल्वे पोलिसांनी रेल्वे मार्गावर सुरक्षा वाढविण्यात आलेल्या आहे. याशिवाय , रुळालगतच्या झोपडपट्टय़ांमधून फुगे मारले जातात. त्यामुळे या भागात गस्त घालून झोपडीधारकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा : Mumbai Police : पोलिसांनी खाजगी वाहनावर 'पोलीस' पाटी लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई