मुंबई : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच काही पोलीस अधिकारी वर्गाच्या बदल्या केल्या. या बदल्यात एक बाब एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना जाणवली. ते म्हणजे एमपीएसी आणि इतर परीक्षा घोटाळा बाहेर काढणाऱ्या आय पी एस भाग्यश्री नवटके ( IPS Bhagyashree Navtake ) यांना महाराष्ट्र शासनाने साईड पोस्टिंग दिली. साईड पोस्टिंग देत चंद्रपुरात त्यांची बदली केली गेली. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व्यक्तींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ( Competitive Examination Coordination Committee )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षे संदर्भात भ्रष्टाचार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षे संदर्भात भ्रष्टाचार झाला. राज्यातील लाखो विद्यार्थी जीवाचं रान करून एमपीएसी परीक्षेसाठी तयारी करतात. बहुतांशी विद्यार्थी सामान्य घरातील असतात. सामाजिक दुर्बल किंवा आर्थिक दुर्बल या गटातील संख्या अधिक असते. त्यांना वसतीगृहाचा आणि अभ्यासासाठीचा महागडा खर्च पेलवणारा नसतो. त्यातही जेव्हा ह्या भरती वेळी आणि परीक्षा वेळी घॊटाळा झाला. त्याची मुळापर्यंत जाऊन चौकशी ती ह्या भाग्यश्री नवटके यांनी केली.
साईड पोस्टिंग दिली हे शासनाने चूक केले : शासनाने त्यांना बदली करताना साईड पोस्टिंग दिल्याची भावना सर्व विद्यार्थी वर्गात झाली. याबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र निमंत्रक राहुल गोठेकर यांनी सांगितले, ह्या मॅडम अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांनी आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा भरती पेपरफुटी, आणि TET घोटाळा बाहेर आणला. जनहिताचे धोरण यांनी कृतीमधून राबवले. मात्र त्यांना साईड पोस्टिंग दिली हे शासनाने चूक केले आहे. तर याबाबत आप पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी ईटीव्ही सोबत संवाद साधताना म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने ह्या निर्णयाचा फेरविचार करावा. ज्या अधिकाऱ्यांनी परीक्षा असेल किंवा भरती असेल या प्रकारचे घोटाळे बाहेर काढले . कर्तव्यदक्ष अशा अधिकारी भाग्यश्री नवटके याना साईड पोस्टिंग देणे हे चूक आहे.
2019 मध्ये वादग्रस्त विधानामुळे झाली होती बदली : दलितांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची बदली करण्यात आली होती. त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नवटकेंची एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांची बदली बीडवरून औरंगाबादला करण्यात आली होती.
काय होते त्या व्हायरल क्लिपमध्ये : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके मी गेल्या ६ महिन्यात २१ दलितांना फोडले आहे, मुस्लिमांना फोडले आहे. माझ्या या कारवाईमुळे सगळ्यांना कडक मेसेज मिळाला आहे, की मॅडम कुणालाच सोडत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.