ETV Bharat / state

search operation : पोलीसांनी घेतली रात्री गुणवंत सदावर्तेंच्या घराची झडती - Sharad Pawar House Protest

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी (ST workers' agitation) अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते (Ad. Gunaratna Sadavarte) यांच्या निवासस्थानी पोलिसांनी १० एप्रिलच्या रात्री शोधमोहीम (search operation) राबवली.

search operation
शोधमोहीम
author img

By

Published : Apr 11, 2022, 6:38 AM IST

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी पोलिसांनी १० एप्रिलच्या रात्री शोधमोहीम राबवली.

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या (Sharad Pawar House Protest) आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर 109 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंदोलनाच्या दिवशी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱया ४ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींनी आंदोलनाच्यावेळी अनेक गोष्टींचे नुकसान केले आहे, त्याचे सीसीटीव्हीही आहेत. आरोपीची भाषा ही कुणीतरी बोलायला लावणारी होती. त्यामुळे नक्कीच त्यांना भडकवले असल्याचे दिसून येते असे या प्रकरणात सरकार पक्षाचे म्हणने आहे.

हे सर्व सुनियोजित होते, आरोपींनी माध्यमांना दिलेली भाषणे पाहिली तर अनेक गोष्टी स्पष्ठ होताना दिसत आहेत. या घटनेत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर चप्पल, दगड मारले आहेत. एका पोलिसाला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. अटक केलेले आरोपी तपासाला सहकार्य करत नाहीत. चुकीची नावे सांगत आहेत. यावर असाही संशय येतो की हे खरंच एसटी कामगार आहेत? गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर सदावर्तेंची सगळ्या बाजुने तपास करण्यात येत आहे.

  • Maharashtra | Police conducted a search operation on the night of April 10 at the residence of lawyer Gunaratna Sadavarte, who was arrested in connection with an ST workers protest outside the Mumbai residence of NCP leader Sharad Pawar. pic.twitter.com/6cVY7obaaF

    — ANI (@ANI) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हही वाचा : Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुप्तचर विभागाने तीन महिने आधीच दिला होता इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.