मुंबई - हवामान खात्याकडून वायू चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा मुंबईवरचा धोका टळला तरी मुंबईच्या समुद्रकिनारी पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईच्या समुद्रकिनारी ५० ते ५५ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मासेमारी करणाऱ्या बोटींना समुद्रात जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा दलाच्या मदतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर समुद्रात अडकलेल्या बोटींना सुरक्षितरीत्या समुद्र किनारी येण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे.