ETV Bharat / state

चक्काजाम आंदोलनादरम्यान प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपाचे राज्यभरात चक्काजाम आंदोलन

राज्यभरात भाजपाचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. ठाण्यात देखील आज (शनिवारी) चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना काॅलजजवळ हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. काही क्षणात पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांचाही समावेश आहे.

Police arrested Pravin Darekar during Chakkajam agitation in thane
चक्काजाम आंदोलनादरम्यान प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Jun 26, 2021, 11:46 AM IST

ठाणे - ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपाचे आज (शनिवार) राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना काॅलजजवळ हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. काही मिनिटेच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Police arrested Pravin Darekar during Chakkajam agitation in thane
चक्काजाम आंदोलनादरम्यान प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्या सह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी ठीक १० वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या आधी ९ वाजल्यापासून भाजपा कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे १० वाजता आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली. दरम्यान काही क्षणात पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - ओबीसी आरक्षण; देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

For All Latest Updates

TAGGED:

Thane
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.