ETV Bharat / state

Police Arrested Accused : अभिनेत्रीला सोशल मीडियावर त्रास दिल्याप्रकरणी आरोपीला अटक - सोशल मीडियावर त्रास

वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली (accused harassing actress on social media) आहे. या अभिनेत्रीला गेल्या काही महिन्यांपासून या त्रासाचा सामना करावा लागला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली (accused harassing actress in Mumbai) आहे.

Police Arrested Accused
अभिनेत्रीला त्रास देणाऱ्या आरोपीला अटक
author img

By

Published : Dec 13, 2022, 9:34 AM IST

मुंबई : एका 35 वर्षीय व्यक्तीला अंधेरी या पश्चिम उपनगरात एका 26 वर्षीय वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठलागकरून त्रास दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती डीएन नगर पोलीसांनी सोमवारी दिली (accused harassing actress on social media) आहे.

अश्लील संदेश : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदी आणि बंगाली भाषेतील वेब सिरीजमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीला गेल्या काही महिन्यांपासून या त्रासाचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असताना अभिनेत्रीला एका अज्ञात व्यक्तीकडून अश्लील संदेश आले होते, असे पोलिसांनी (accused harassing actress in Mumbai) सांगितले.

गुन्हा दाखल : तिने त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले. मात्र तो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज पाठवू लागला. काही दिवसांनंतर, त्याने तिला आणि तिच्या पतीला ट्विटरवर बदनामीकारक सामग्रीसह टॅग करणे सुरू केले, अधिकाऱ्याने पुढे सांगितले. आरोपी व्यक्तीने अलीकडेच अभिनेत्रीचा संपर्क क्रमांक मिळवला. तिला कॉल करण्यास सुरुवात केली आणि तिला मजकूर संदेश देखील पाठवला. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्याने सोशल मीडियानंतर तिचा वैयक्तिकरित्या पाठलाग देखील केला. अभिनेत्रीने डीएन नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली, असे पोलिसांनी (Police Arrested Accused) सांगितले.

वीणा कपूर यांची हत्या : मुंबईतही पश्चिम उपनगरातून एक अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीत राहणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर यांची मालमत्तेच्या वादातून तिचा मुलगा सचिन कपूर याने निर्घृणपणे हत्या केली होती. पोलीस उपायुक्त अनिल पारसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा सचिन कपूर याने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की, ही घटना रागाच्या भरात संपत्तीच्या वादातून घडली. त्याने तिच्या डोक्यावर बेसबॉल बॅटने वारंवार प्रहार केला. त्यानंतर तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे फेकून दिला. जुहू पोलिसांनी चौकशीनंतर आरोपी सचिन कपूरआणि त्यांच्या घरातील नोकर छोटू उर्फ लालूकुमार मंडल याला हत्येप्रकरणी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली (Police arrested accused harassing actress) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.