मुंबई - मानखुर्दमध्ये रस्त्याच्या कडेला बेवारस आणि भंगार वाहनांमुळे नागरिकांना चालण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. त्याच बरोबर सर्व ठिकाणी मेट्रोचे काम चालू असल्यामुळे वाहतूककोंडी आणि स्थानिक लोकांसाठी पार्किंगची समस्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून भंगार आणि बेवारस वाहनांवर पोलिसांनी कारवाई करणे सुरू केले आहे.
वाहतूक पोलिसांची कारवाई -
बाजीप्रभु देशपांडे मार्ग, अहिल्याबाई होळकर मार्ग इत्यादी मार्गांवरून तबल 300 हून अधिक गाड्या उचलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रिक्षा, मोटरसायकल, टेम्पो, इत्यादी खाजगी वाहनाचा ही समावेश आहे. स्थानिक नागरिकांना या सर्व गोष्टीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर मानखुर्द वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे स्थनिक लोकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.