मुंबई - कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वरळीतील पोद्दार रुग्णालयात रोबोट ‘गोलर’ ऑन ड्युटीवर दाखल झाला आहे. रुग्णांना अन्न, पाणी आणि औषधे पोहोचवण्याचे काम यामुळे सोपे झाले आहे. या रोबोटमुळे पोद्दार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी रोबोट गोलरच्या सेवेचा पहिला व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओमध्ये 'आपला रोबोट ‘गोलर’ हा आहे. तो पोद्दार रुग्णालयात कर्तव्यावर दाखल झाला आहे. अन्न, पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'गोलर' करत आहे, असा संदेश पोस्ट करण्यात आले आहे. रोबोट गोलर स्थानिक कोविड फ्रंटलाईन वर्कर्सनी बनवला आहे.
या रोबोटचा फायदा नक्कीच होत आहे. रुग्णांना ज्या गोष्टी द्याव्या लागतात जसे की डिसपेंसरीसाठी खूप मोठी मदत होत आहे. डाॅक्टरांचा होणारा जो धोका आहे, तो कमी होणार आहे. औषधे, नाश्ता, जेवण, पाणी हे सर्व देण्यासाठी या रोबोटचा फायदा नक्कीच होतो आहे. डाॅक्टरांचा जो रुग्णांशी होणारा संपर्क आहे, तो कमी होणार आहे. पोदार रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक, डाॅ. प्रद्या कापसे यांनी याबाबतची माहिती दिली.