ETV Bharat / state

Sanjay Raut Passport Renewal : संजय राऊत यांच्या पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लेखी प्रतिसाद द्या, कोर्टाचे ईडीला निर्देश

संजय राऊत यांच्या पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर ईडीला लेखी प्रतिसाद देण्याचे निर्देश पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत. तसेच पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर आज देखील आरोपपत्र दाखल झाले नाही.

Sanjay Raut Passport Renewal
संजय राऊत पासपोर्ट नूतनीकरण अर्ज
author img

By

Published : May 10, 2023, 5:14 PM IST

मुंबई : मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर आज आरोप पत्र निश्चित होणार होते. मात्र इतर आरोपी गैरहजर राहिल्यामुळे आज देखील सुनावणी तहकूब करण्यात आली. मात्र संजय राऊत यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाबाबत न्यायालयासमोर अर्ज सादर केला गेला. या अर्जावर अंमलबजावणी संचलनालयाला लेखी प्रतिसाद देण्याचे निर्देश सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहेत.

पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला : तब्बल 1034 कोटी रुपयांच्या कथित पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत आरोपी आहेत. त्याच्यावर पीएमएलए न्यायालयात खटला सुरू अहे. या प्रकरणी ते अनेक महिने तुरुंगात होते. परंतु त्यांना गुणवत्तेच्या आधारे न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी जामीन दिला आहे. संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. आज त्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आपल्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला. संजय राऊत यांनी जो पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज दाखल केला आहे तो अर्ज डिप्लोमॅट असल्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाकडून यावर कोणताही आक्षेप घेतला जाणार नाही, अशी शक्यता आहे. कारण आज या अर्जावर सुनावणी झाली असताना न्यायालयासमोर सक्तवसुली संचालनालयाने कोणताही आक्षेप घेतला नाही. म्हणूनच सक्तवसुली संचालनालयाला काय म्हणायचे आहे, त्यांनी ते लेखी स्वरूपात उद्यापर्यंत न्यायालयात सादर करावे, असे निर्देश राहुल रोकडे यांनी दिले आहेत.

सुनावणी 20 जून पर्यंत तहकूब : यापूर्वी आरोप निश्चितीसाठी सुनावणी झाली असता इतर सह आरोपी आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर झाले नाही. आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान गैरहजर होते. मात्र संजय राऊत तसेच इतर आरोपी प्रवीण राऊत हे हजर होते. त्यामुळे आरोप निश्चिती होऊ शकली नाही. त्यामुळे आजची सुनावणी न्यायालयाने 20 जून पर्यंत तहकूब केली आहे. आरोप पत्र निश्चिती करण्यासाठी आता 20 जून रोजी सुनावणी होणार आहे.

इतर आरोपी हजर नसल्याने सुनावणी तहकूब : या बहुचर्तीत 1034 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये सह आरोपी असणारे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने देखील यामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सक्तवसुली संचलनालयाने म्हटले आहे. मात्र आज आरोप पत्र निश्चित करण्याच्या सुनावणीदरम्यान गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने वकिलांनी आज पहिल्यांदाच वकीलपत्र दाखल केले. त्यांच्या वतीने वकिलांनी सांगितले की, राकेश आणि सारंग वाधवान आता गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत नाहीत. परंतु इतर आरोपी सुनावणीसाठी हजर नसल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Rahul Narwekar : 'तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच', राहुल नार्वेकरांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
  2. Maharashtra political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल, सुप्रीम कोर्टाची माहिती
  3. Nitish Kumar Mumbai Visit: नितीश कुमार उद्या मुंबईत घेणार उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळाचे वेधले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.