मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बँकेचे माजी संचालक वारियम सिंग कर्तारसिंगला माहिम परिसरातून (६८) अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तिघांना अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
एचडीआएल कंपनीचा सारंग वाधवा, राकेश वाधवा, पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा एमडी जॉय थॉमस या तिघांना यापूर्वीच अटक केली. यापैकी जॉईन थॉमस याला शनिवारी दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एचडीएल कंपनीचे संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना न्यायालयाने 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.