ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळा : बँकेच्या संचालकासह 3 जणांना अटक

पीएमसी बँक घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत झालेल्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे संचालक जसविंदर सिंग बनवत यांना अटक केली आहे. बनवत हे पीएमसी बँकेचे कर्ज, गुंतवणूक व इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विश्वनाथ श्रीधर प्रभू व श्रीपाद गोविंद जेरे या दोन व्यक्तींनासुद्धा अटक केली आहे.

पीएमसी बँक घोटाळा
पीएमसी बँक घोटाळा
author img

By

Published : Mar 12, 2020, 7:03 PM IST

Updated : Mar 12, 2020, 7:34 PM IST

मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र बँक व एचडीआयएलच्या तब्बल ४३५५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत झालेल्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचे संचालक जसविंदर सिंग बनवत यांना अटक केली आहे.

बनवत हे पीएमसी बँकेचे कर्ज, गुंतवणूक व इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पीएमसी बँकेने एचडीआएलला दिलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जामागे या संचालकाचा मोठा हात असल्याचेही आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विश्वनाथ श्रीधर प्रभू व श्रीपाद गोविंद जेरे या दोन व्यक्तींनासुद्धा अटक केली आहे.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी संचालकासह 3 जणांना अटक

अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती 'यार्डी प्रभू कन्सल्टंट एन्ड व्हॅल्युअर्स' या कंपनीचे अधिकारी आहेत. पीएमसी बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस यांच्या सांगण्यावरुन या दोघांनी बँकेच्या मालकीच्या संपत्तीचे व्हॅल्युएशन २०१२ व २०१५ मध्ये अधिक दाखवून तशा प्रकारचा अहवाल रिझर्व बँक ऑफ इंडियाला पाठवलेला होता.

हेही वाचा - 'कामगार नेते दत्ता इस्वलकरांनी त्यांच्या अनुभवाचे लिखाण करावे'

अटक करण्यात आलेल्या आरोपींची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाची समाधानकारक उत्तर हे तिघे देत नसल्यामुळे त्यांना १२ मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - ..तरच कस्तुरबा रुग्णालयात प्रवेश करा, प्रशासनाकडूनच वाढवली जातेय भीती

Last Updated : Mar 12, 2020, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.