मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहिले जाणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार (PM Narendra Modi will check) आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्र्यांची धाकधूक वाढलेली पाहायला मिळते. पंतप्रधान काढणार असलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये आपला रिपोर्ट नेमका कसा असणार, याची चिंता जवळपास सर्वच मंत्र्यांना आहे. कारण ज्या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड चांगले नाही, अशा मंत्र्यांना डच्चू देण्याचे काम याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या विभागात चांगले काम केले नाही, तर मोठ्या मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळातून डच्चू दिला जातो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इतिहास आहे. याआधीही रिपोर्ट कार्ड चांगले नसल्यामुळे अनेकांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळेच यावेळी आपले रिपोर्ट कार्ड चांगले नसेल तर आपल्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल, अशी भीती अनेक मंत्र्यांच्या मनामध्ये (Report Card of all Union Ministers) आहे.
मंत्र्यांविरोधात खासदारांच्या तक्रारी : केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांच्या विरोधात स्वतः भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी थेट भाजप पक्षाध्यक्ष किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. संबंधित मंत्र्यांच्या खात्यात एखादे काम घेऊन गेल्यास ते काम होत नाही. अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी ज्येष्ठ नेत्यांकडे वाचलेला आहे. अशा मंत्र्यांच्या खात्यांवर विशेष नजर रिपोर्ट कार्ड तयार करत असताना ठेवली जाणार आहे. खास करून केंद्रीय मंत्र्याच्या खात्याने देशाचा जीडीपी वाढवण्यात किती हातभार लावला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आवर्जून पाहतात. जीडीपी वाढवण्यासंदर्भात संबंधित मंत्र्याने कोणतीही महत्त्वाची पावले उचलली नसतील, योजना आखलेल्या व्यवस्थित राबवल्या नसतील तर तशा मंत्र्यांना डच्चू दिला जातो हा इतिहास आहे.
मंत्र्यांचे धाबे दणाणले : पंतप्रधान सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार हे समजताच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसहित केंद्रातील इतर मंत्र्यांचे धाबे दणाणले असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच यंदाच्या वर्षात केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी नेहमीप्रमाणे पंतप्रधान सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासतील आणि ज्या मंत्र्यांनी व्यवस्थित काम केलेले नाही, अशांना पुन्हा एकदा डच्चू देण्याचे काम पंतप्रधान करणार असून यामध्ये महाराष्ट्रातले दोन मंत्री असल्याची शक्यता आहे. तर तेथेच संपूर्ण मंत्रिमंडळातून कमीत कमी सात ते आठ मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, अशी शक्यता प्रवीण पूरो यांनी व्यक्त (report card of all Union Ministers ) केली.
'या' मंत्र्यांचे कार्ड तपासले जाणार नाही : केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांची धाकधूक वाढली असली तरी काही मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले जाणार नाही. यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (सुरक्षा मंत्री), गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री मनसुख मांडवी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल उद्योग मंत्री, श्रम आणि रोजगार भूपेंद्र यादव या केंद्रीय मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड तपासला जाणार नसल्याची देखील माहिती (Modi will check report card) आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील मंत्री : महाराष्ट्रातील नितीन गडकरी - रस्त्ते वाहतूक मंत्री, पियुष गोयल - उद्योग मंत्री, नारायण राणे - मध्यम लघु व सूक्ष्म उद्योग खाते, भारती पवार- राज्य आरोग्यमंत्री, कपिल पाटील पंचायत राज्य मंत्री, भागवत कराड - केंद्रीय राज्य अर्थमंत्री, रावसाहेब दानवे पाटील- राज्य रेल्वे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले मंत्री (PM will check report card of Union Ministers) आहे.
सत्तांतराचा फटका : राज्यामध्ये सत्तांतर झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून शिंदे गटांच्या खासदारांना संधी मिळावी, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कॅबिनेट मंत्रीपद जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या सत्तांतराचा फटका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही बसेल. शिंदे गटातील खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा मिळावी, यासाठी दिल्लीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे यांचे केंद्रीय पद जाणार असे मुंबई पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत.