मुंबई - गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तर देशावर हल्ले होत असताना विरोधक देशाबाहेरील विरोधकांना म्हणजेच मिर्चीचा व्यापार मिर्चीसोबत करत होते. त्यामुळे यातील कोणालाच सोडणार नाही, असा इशारा मोदींनी यावेळी दिला. बिकेसीतील मैदानावर भाजप-शिवसेना महायुतीची शुक्रवारी संयुक्त सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
हेही वाचा - आघाडीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ले, बीकेसी येथील सभेत नरेंद्र मोदींची टीका
पुढे बोलताना ते म्हणाले, तसेच आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? आघाडीने आदर्श घोटाळा करुन लष्करातील जवानांच्या घराबाबतही घोटाळा केला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार हे भ्रष्टाचारी तसेच अस्थिर सरकार होते. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने मागील 50 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आणि राज्याला 5 वर्षे स्थिर सरकार दिले. आपल्या त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 'मेरे छोटे भाई' असा उल्लेख केला.
हेही वाचा - पाच दिवसांपासून नाशिकच्या HAL कर्मचाऱ्यांचा संप सुरू; शरद पवारांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
तसेच फडणवीस सरकारच्या काळात दहशतवाद्यांवर जरब बसवण्यात केंद्रातील आणि राज्यातील सरकार यशस्वी झाल्यामुळे मुंबईवर कोणताही हल्ला झाला नाही. मुंबई सुरक्षित राहिली. म्हणून या आपल्या सरकारला पुन्हा विक्रमी मताने जिंकून आणा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
हेही वाचा - 'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत'
युती सरकार बद्दल बोलताना ते म्हणाले, मुंबईतील मेट्रो-ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळचे काम महायुतीच्या सरकारने वेगाने पुढे नेले. तर याबरोबरच शिवछत्रपतींचे स्मारक देखील पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीवर टीका करताना मोदी यांनी राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी पक्ष आहे. काहीजण तिहारमध्ये आहेत. तर काहीजण येरवडामधे आहेत. या निवडणुकीनंतर यात अनेकांची भर पडेल. यावेळी मोदी यांनी केंद्राच्या अनेक योजनांचा उल्लेख केला. तसेच यावेळी मतदान सोमवारी असल्यामुळे रविवारी आणि सोमवार अशी 2 दिवस सुटी आहे. त्यामुळे मतदान आवश्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. तर मोदींचे भाषण सुरू असताना कार्यकर्ते आणि जनता निघून जाताना दिसत होती.