ETV Bharat / state

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समीटचं उद्घाटन; मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 7:28 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (14 ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्तानं मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, या दौऱ्यामुळं कोणतेही रस्ते बंद करण्यात आले नसल्याची माहिती मुबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं दिली.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणजेच 14 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. शनिवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील 'जियो वर्ल्ड सेंटर' इथं आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राचं आयोजन (141st International Olympic Committee) केलंय. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या सत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यानं मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांची ही एक महत्वाची बैठक मानली जाते. या सत्रात ऑलिंपिक स्पर्धांच्या भविष्याशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. या आधीची बैठक सुमारे 40 वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे 86 वे सत्र, नवी दिल्लीत 1983 मध्ये पार पडले होते. त्यामुळं या कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुंबईत येत आहेत. त्यामुळं मुंबई पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलाय.

तीनशे पोलिसांचा बंदोबस्त : मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं की, शनिवारी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यानं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शनिवारी तीनशे पोलिसांचा बंदोबस्त नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ठेवण्यात येणार आहे.

वाहतुकीत बदल नाही : वांद्रे कुर्ला संकुल येथील 'जियो वर्ल्ड सेंटर' येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार असल्यानं या सेंटरचा परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तपासण्यात येणार आहे. शनिवारी नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावरून पाच वाजून 40 मिनिटांनी वांद्रे कुर्ला संकुल येथील 'जिओ वर्ल्ड सेंटर'च्या दिशेने रवाना होतील. दरम्यान, वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी मुंबई पोलिसांचे वाहतूक विभाग सतर्क असेल. मात्र, कोणत्याही प्रकारचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले नसून, मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. जर काही वाहतुकीत बदल केला गेला तर त्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या 'ट्विटर'वर माहिती दिली जाईल, असेही पडवळ यांनी पुढे सांगितले.

हेही वाचा -

  1. PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर; ऑलम्पिक समिती अधिवेशनाचे करणार उद्‌घाटन
  2. IOC Session Mumbai 2023 : आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची १४ ऑक्टोबरपासून मुंबईत बैठक; तर क्रीडा मंत्र्यांनी केली 'ही' मागणी
  3. Narendra Modi Meet Players : पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेतली, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.