मुंबई : देशभरात लाखो नागरिक प्रवास करतात. जिथे पाहावे तिथे रांगाच रांगा दिसतात. रेल्वे, बस किंवा मेट्रो असो अफाट गर्दी असल्याने प्रत्येक वाहतूक स्थानकावर रांग पाहायला मिळते. मात्र आता मुंबई मेट्रो 2अ आणि 7 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हाच मेट्रो, बस आणि रेल्वेसाठी उपयुक्त मुंबई 1 ॲपचे आणि राष्ट्रीय प्रवास कार्डचे देखील अनावरण होईल.
राष्ट्रीय समान प्रवासी कार्ड : मध्य रेल्वे किंवा पश्चिम रेल्वे या ठिकाणी आपण लोकल ट्रेनसाठी तिकीट काढण्याकरिता हजारो नागरिकांच्या रांगा पाहतो. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड काढलेले आहेत. त्या कार्डच्या आधारे रेल्वेचे तिकीट आपल्याला सहज सोप्या पद्धतीने घरी बसल्या काढता येते. मात्र ते कार्ड केवळ रेल्वेच्या तिकिटापुरते मर्यादित होते. आता पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय समान प्रवास कार्डचा देशात कुठेही प्रवास करताना उपयोग होईल. त्याशिवाय मुंबईत तर रेल्वे बस आणि मेट्रो करता येईल.
युटीएस एप ठरले यशस्वी : मुंबई रेल्वेने महत्वाचे आणि युटीएस अनोखे ॲप्लीकेशन जारी केले आहे. आपण लाखो नागरिक मुंबई उपनगर, शहर, ठाणे किंवा पालघर रायगड जिल्ह्यातील जे प्रवासी मुंबईमध्ये सतत प्रवास करतात. अशा अनेक लोकांनी ॲप्लीकेशन डाउनलोड केले. युटीएस ॲप भारतातील कोणताही नागरिक डाउनलोड करू शकतो. घरबसल्या ते उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशनपासून नागरिक किमान दोन किलोमीटर ते पाच किलो मीटर अंतरापर्यंत दूर असले तरी त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये तिकीट काढता येणार आहे. तसेच मेल एक्स्प्रेसचे देखील तिकीट काढता येणार आहे.
कार्डमध्ये एक चिप : त्या प्रमाणे मेट्रो करिता मुंबई १ हे एप्लिकेशन लवकरच सुरू केले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय समान प्रवासी कार्ड देखील सुरू केले जाईल. त्या कार्डमध्ये एक चिप असेल. हे कार्ड देशात कुठेही प्रवास करताना वापरता येईल. तसेच भविष्यात त्या कार्ड आधारे खरेदीही करता येईल, टोल भरता येईल.
मुंबई शिवाय इतर मेट्रोसाठी वापर : ज्याप्रमाणे एकदा आधार क्रमांक मिळाला की त्या क्रमांकाच्या आधारे सरकारी एजन्सीकडे व्यवहार करताना त्याचा उपयोग होतो किंवा वेगवेगळे शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शासकीय शालेय दाखला मिळवण्यासाठी, गॅस एजन्सीकडे, मंत्रालय, खासगी कार्यालयामध्ये आधार क्रमांकाच्या आधारे ओळख होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रवास कार्ड हे सर्व मेट्रो रेल्वेसाठी वापरले जाईल. अंधेरी, वर्सोवा मेट्रो, मेट्रो लाईन तीन किंवा चेन्नई मेट्रो, दिल्ली मेट्रो, राष्ट्रीय प्रवासी कार्ड वापरता येईल.
2000 रुपयांपर्यंत रिचार्ज : या कार्डमध्ये शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयापर्यंतचे रिचार्ज करता येऊ शकतो. जेणेकरून दिल्ली चेन्नई अशा विविध ठिकाणच्या मेट्रो रेल्वेसाठी त्यामधून तिकीट सहज काढता येऊ शकेल. राज्य बसने प्रवास करताना देखील या कार्डचा उपयोग होऊ शकेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडियासोबत तसा करार करून हे कार्ड सुरू केले जात आहे. याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण आयुक्त श्रीनिवासन यांनी इटीवी भारतला माहिती दिली की," एप्लीकेशन केवळ मेट्रोच्या प्रवाशांसाठी लागू असेल. त्यांना त्याचा वापर करता येईल आणि राष्ट्रीय प्रवास कार्ड देशात कुठेही वापरता येईल. मात्र त्याची चाचणी सुरू आहे. त्या पूर्ण झाल्या की ते देखील कार्ड जनतेला
हेही वाचा : family Suicide In Pune : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या उपलब्ध होईल."