मुंबई PM Modi Mumbai Visit : ऑलम्पिक समितीचे अधिवेशन मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १५ ते १७ ऑक्टोबरला पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती आलेली नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येणारी असणार आहे.
'हे' मान्यवर शिष्टमंडळात सदस्य: आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन मुंबईत १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर या अधिवेशनाचे यजमानपद भूषविण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी, मार्क ॲडम्स, मरीना बारामिया, ख्रिस्टेन क्लाई, मोनिका श्रेर, टिना शर्मा यांचा समावेश आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून देशातील गुणी खेळाडूंना संधी उपलब्ध करू दिली. गेल्या नऊ वर्षांत भारतात क्रीडा क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत तिपटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळेच आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करत शंभरी पार पदके जिंकली आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात खेळांसाठीच्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अशा पायाभूत सुविधा उभ्या होऊ लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय युवकांमधील क्षमतांचा विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने तरुणांना खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. भारताने या आधीही अशा भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता सिद्ध केली आहे.
स्वप्न सत्यात येईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबर भारतात ऑलिंपिक स्पर्धांच्या संयोजनाचे स्वप्न पाहिले आहे. या कारणाने आता हे स्वप्न सत्यात येईल, अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे. ऑलिंपिक समितीचे हे अधिवेशन महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसाठी मोठी महत्त्वाची संधी असणार आहे. यातून मुंबईची आंतरराष्ट्रीय शहराचा लौकिक अधिक बळकट होणार आहे. समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आणि अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पूर्वीच व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समितीच्या सदस्य म्हणून आणि तेही एका महिलेच्या रूपाने नीता अंबानी यांनी स्थान मिळवळे आहे.
हेही वाचा: