मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) आहे. या विमानतळावर रोज 150 पेक्षा अधिक विमानांची ये जा होते. शिवाय 40 हजारांपेक्षा अधिक प्रवासी दर दिवशी या ठिकाणी उतरतात. त्यामुळे अनेक नागरिक प्लास्टिक बॉटल वापरतात. आता त्यावर उपाय शोधून कार्बन-डाय ऑक्साईडचे ( carbon dioxide ) प्रमाण कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. रिवर्स वेंडिंग मशीन ( Reverse vending machine ) या ठिकाणी लावलेल्या असून प्लास्टिकच्या बाटल्यांचा त्यामुळे पुनर्वापर सुरू झाला आहे.
प्रदूषणाला आळा घालण्याचे काम- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईच्या देशाच्या महत्त्वाचे विमानतळापैकी एक आहे. या ठिकाणी हजारो प्रवासी रोज येतात. आपल्या जवळील प्लास्टिकच्या बॉटल इतरत्र किंवा कचऱ्याच्या डब्यात ते टाकतात. परंतु कचऱ्याच्या डब्यातून या प्लास्टिकच्या बॉटल पुन्हा त्या कचऱ्याकडे जातात. त्याचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे त्याच्यातून कार्बनडा ऑक्साईड तयार होतो. त्यामुळे प्रदूषणात अधिक वाढ होते. या प्रदूषणाला आळा घालण्याचे काम काही प्रमाणात या द्वारे केले जाणार.
प्लास्टीकचा पुर्नवापर- प्लास्टिक हा विघटन होणारा पदार्थ नाही. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केल्यास त्याचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने रिवर्स वेंडिंग मशीन या ठिकाणी आजपासून सुरू केली आहे. ही मशीन वापण्यासाठी अत्यंत सोपी तसेच वातावणाला अनुकुल आहे. त्यामुळे प्लास्टीकचा पुर्नवापर होण्यास मदत होणार आहे.
कार्बनचे उत्सर्जन कमी - इंटरॅक्टिव्ह 16 इंच टच स्क्रीन वापर असलेलं हे मशीन आहे .त्याचा उपयोग करताना बॉटल त्या मशीनमध्ये टाकल्यावर एक कुपन दिले जाते. त्याची नोंदणी केली जाते. व्यक्तीचे त्याचं नाव देखील त्या ठिकाणी नोंदवल जातं. प्रत्येक व्यक्तीला त्याबद्दलचे श्रेणी मिळते तसेच नंतर मोबाईलवर त्याचा मेसेज देखील येतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर या रिवर्स वेंडिंग मशीन मध्ये तासाला 450 बाटल्या स्वीकारल्या जातात. या बाटल्यांचा तिथे बारीक चुरा केला जातो. त्याचा पुनर्वापरासाठी तो कचरा उपयोगात येतो. सुमारे दिवसभरात एकूण हजारो बाटल्यांचा 70 टक्के कचरा हा त्या वेल्डिंग मशीनमध्ये बारीक केला जातो. पुन्हा तो मशीनद्वारे पुन्हा वापरण्यासाठी पाठविला जातो, त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते.
प्रदूषण कमी होण्यास मदत - यासंदर्भात छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण प्रवक्त्यांने सांगितले की, रिवर्स वेंडिंग मशीन लावण्यामागे उद्देश कार्बनचे उत्सर्जन प्रमाण कमी करणे, वातावरणामध्ये कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण कमी करणे आहे. जेणेकरून प्रदूषण कमी होईल. त्यामुळे हा उपक्रम विमानतळ प्राधिकरणाच्या द्वारे सुरू करण्यात आलेला आहे. वाहतूक विभाग आणि लॉजिस्टिक विभाग या ठिकाणी आम्ही प्लास्टिकची बंदी सुरू केलेली आहे. त्यामुळे तिथे खर्चाची देखील बचत होते. शंभर टक्के प्लास्टिक मुक्त वातावरणाकडे विमानतळ प्राधिकरणाने आता वाटचाल केली आहे.
प्लास्टिवर प्रक्रिया सुरु - प्राधिकरण प्रवक्ता यांनी पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर सुमारे 85 टन परवानगी असलेल्या पाण्याच्या बाटलींच्या कचरा या वेंडिंग मशीनमध्ये टाकला गेला आहे. त्याचा पुनर्वापर देखील करण्यासाठी आता तो प्लास्टिकचा कचरा संबंधित एजन्सीकडे गेलेला आहे. त्याच्यावर प्रक्रिया करून तो पुन्हा वापरला जाईल जेणेकरून जमिनीमध्ये किंवा नदी नाले किंवा समुद्रामध्ये प्लास्टिक आता जाणार नाही त्याचा पुनर्वापर होईल.