ETV Bharat / state

गुढीपाडव्याच्या रॅलीत अथक प्रतिष्ठाणची प्लास्टीक मुक्त मुलुंडची हाक; मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग - Mumbai

मुलुंड परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी 'अथक प्रतिष्ठान'ने गुढीपाडव्यानिमित्ताने मुलुंड प्लास्टिक मुक्तीची हाक दिली होती. शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

प्लाॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारे 'अथक' प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते
author img

By

Published : Apr 7, 2019, 11:27 PM IST

मुंबई - मुलुंड परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी 'अथक प्रतिष्ठान'ने गुढीपाडव्यानिमित्ताने मुलुंड प्लास्टिक मुक्तीची हाक दिली होती. शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्लास्टिक मुक्त भारत तसेच मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याचीही हाक देण्यात आली होती.

प्लाॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारे 'अथक' प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते

मराठी नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रतिष्ठानच्या अतुल कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा भारत स्वच्छ भारतसह प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे. महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदी आहे, पण जे प्लास्टिक बंद झाले ते फक्त 'वन टाईम' वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे की फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक आहे. बाकी ९५ टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे . त्याअनुषंगाने प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मोहीम चालू असल्याचे अतुल कस्तुरे म्हणाले. मुलुंडमध्ये आमचा पायलट प्रोजेक्ट चालू आहे. जेणेकरून आम्ही महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक पुण्याला पाठवतो जिथे प्लास्टिकचे रूपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येते, म्हणजेच त्याला इंसोल्युशन देण्यात येते. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही व पुढे त्याचे डिझेलमध्ये रुपांतर होईल. मुलुंडमधील जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळांचा सहभाग असतो. आम्ही मागील २६ महिन्यांपासून हा कार्यक्रम चालू केला आहे.

या कामी स्थानिक नगरसेवक आणि सगळ्याच पक्षांची आम्हाला मदत मिळत असल्याचे प्रतिष्ठाणच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेता सबंध मुलुंडकरांनी या कामी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.

Intro:एक हाक प्लास्टिक मुक्त मुलुंडची गुडीपाडवा शोभायात्रेत अथकचा सहभाग..

मुलुंड प्लास्टिक मुक्त साठी अथक प्रतिष्ठान तर्फे एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्तीची ही शोभायात्रा आज गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली आहे .यात प्लास्टिक मुक्त भारत एक हाक मुलुंड प्लास्टिक मुक्त करण्याची हा संदेश घेऊन आज नववर्षानिमित्त शोभायात्रेत अथक प्रतिष्ठानचे मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या प्रतिष्ठानचे अतुल कस्तुरे यांनी मेरा भारत स्वच्छ भारत ही घोषणा देत प्लास्टिक मुक्त मुलुंड हा संदेश दिला आहे.

Body:महाराष्ट्र राज्यामध्ये प्लास्टिक बंद आहे पण जे प्लास्टिक बंद झालेले ते फक्त वन टाईम वापरले जाणारे प्लास्टिक आहे. जे की फक्त पाच ते सहा टक्के प्लास्टिक बाकी 95 टक्के प्लास्टिक आपल्या घरात येत आहे . ती प्लास्टिक मुक्त मुलुंड ठेवण्यासाठी ही मुलुंडमध्ये मोहीम चालू आहे .असे अतुल कस्तुरे म्हणाले मुलुंडमध्ये आमच्या पायलट प्रोजेक्ट चालू आहे .जेणेकरून आम्ही महिन्याला महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्लास्टिक गोळा करून प्लास्टिक पुण्याला पाठवतो जिथे प्लास्टिकचा रूपांतर हायस्पीड डिझेलमध्ये करण्यात येतं म्हणजे त्याला इंसोल्युशन देण्यात येते आहे. हे प्लास्टिक निसर्गात परत जाणार नाही त्याचं डिझेल मध्ये रुपांतर होईल मुलुंड मध्ये जवळपास शंभर सोसायट्या आणि सर्वच शाळा यांचा सहभागाव असतो आम्ही गेले 26 महिने हा कार्यक्रम चालू केला आहे .आणि त्यात सध्या लोकल कॉर्पोरेटर आणि सगळ्याच पक्षांचा सगळ्यांचा सहभाग आहे .प्लास्टिक प्रदूषण हीच खूप मोठी समस्या आहे .आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रा मध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे जेणेकरून त्याची प्लास्टिक मुक्त मुलुंड सध्या घरा घरा पर्यंत पोहोचेल.- यावेळी गोखले ताई यांनी मुलुंड प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे प्लास्टिक मुळे आज प्रदूषण रोखण्यासाठी देशात कितीही प्रयत्न केले तरी प्लास्टिक मुक्ती होत नाही. अमचा या शोभायात्रा तुन एकच संदेश दिला जात आहे .स्वच्छ भारत स्वच्छ मुलुंड अथक प्रतिष्ठान रविवारी प्लास्टिक जमा करते आणि ते पुण्यला पाठवतो त्यातून प्लास्टिक चे डिजल मध्ये रूपांतर होते. त्यामुळे जमिनीत न प्लास्टिक चा चांगल्या पद्धतीने पुनर वापर होतो त्यामुळे मुलुंडकरांनी आमच्या कार्याला सहकार्य करावे.

Conclusion:गुडीपाडवा निमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रात मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे पुढील काळात चांगले प्रशासन निर्माण झाले पाहिजे. लोकशाहीच्या हितासाठी आपण सर्वांनी आवश्य मतदान केले पाहिजे असे अथक प्रतिष्ठान चे अतुल कस्तुरे इटीव्ही भारतला बोलताना म्हणाले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.