ETV Bharat / state

कोरोनाच्या तीन अत्यावस्थ रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

गंभीर (अत्यावस्थ) किंवा जास्त लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करता येत नव्हती. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्ण अत्यावस्थ असला तरी डॉक्टरांनी परवानगी दिल्यास प्लाझ्मा थेरपी करता येणार असल्याचे महानगरपालिका रुग्णालयांचे प्रमुख संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

Plasma therapy
प्लाझ्मा थेरेपी
author img

By

Published : Aug 26, 2020, 12:10 PM IST

मुंबई - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला इतर आजार असल्यास त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा असे रुग्ण अत्यावस्थ स्थितीत जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. मात्र, आता अशा रुग्णांना वाचवणे शक्य होणार आहे. तीव्र लक्षणे असणाऱ्या अत्यावस्थ रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरेपी केली जाणार आहे. महानगरपालिकेने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी उपचार पद्धतीला यश आले असून आतापर्यंत तीन गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगरपालिका रुग्णालयांचे प्रमुख संचालक डॉ. रमेश भारमल यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईत महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. २४ ऑगस्टपर्यंत एकूण १ लाख ११ हजार ८४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या १८ हजार २६३ सक्रिय रुग्ण राहिले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)च्या गाईडलाईननुसार प्लाझ्मा थेरेपीदेखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय प्लाझ्मा थेरेपी सेंटर बनवण्यात आले आहे. या प्लाझ्मा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५२ रुग्णांवर केलेल्या उपचारांनंतर संबंधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली. या प्लाझ्मा थेरेपीला येणारे यश पाहता मोठ्या प्रमाणात ही उपचार पद्धती वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या उपचार पद्धतीसाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्लाझ्मा दान करणाऱ्यांना सेंटरवर आणणे, त्यांच्या आवश्यक चाचण्या करणे व प्रवास सुविधाही पालिकेच्या माध्यमातून देण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

'आयसीएमआर'च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही उपचार पद्धती आतापर्यंत सुरू होती. यामध्ये गंभीर (अत्यावस्थ) किंवा जास्त लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करता येत नव्हती. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्ण अत्यावस्थ असला तरी डॉक्टरांनी परवानगी दिल्यास प्लाझ्मा थेरपी करता येणार असल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर प्लॅटिना ट्रायल सुरू झाली असून आतापर्यंत तीन रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याचे भारमल म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.