ETV Bharat / state

Cyrus Mistry accident : उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात ( Cyrus Mistry accident ) प्रकरणात पोलीस तपासावर प्रश्न उभा करण्यात आला आहे. यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( PIL filed in Bombay High Court ) दाखल करण्यात आली आहे. पोलिस योग्य रित्या तपास करण्यात येत नसल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे.

author img

By

Published : Dec 23, 2022, 10:10 PM IST

Cyrus Mistry accident
सायरस मिस्त्री अपघात

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा भीषण अपघातात ( Cyrus Mistry accident ) मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उभे करण्यात आले आहेत. पोलिस योग्य रित्या तपास होत नसल्याच्या आरोपाखाली सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( PIL filed in Bombay High Court ) दाखल करण्यात आली आहे.

याचिकेवर नवीन वर्षात सुनावणी : गुन्ह्यात आरोपी विरोधात अजामीन पात्र कलम दाखल करण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कलम 304 देखील लावण्यात लावे, अशी देखील याचिकेत मागणी केली आहे. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी अॅड सादिक अली यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या जनहित याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सायरस मिस्त्री यांचा अपघात : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री ( Businessman Cyrus Mistry ) हे आपल्या कारने अन्य तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना पालघरजवळ 4 सप्टेंबर 2022 रोजी कारला भीषण अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली होती. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.