ETV Bharat / state

सीएसएमटी पूल अपघात: मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय या पादचारी पुलाचा भाग कोसळून अपघात झाला होता. या प्रकरणी ज्येष्ठ वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Mar 30, 2019, 6:21 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय या पादचारी पुलाचा भाग कोसळून अपघात झाला होता. या प्रकरणी ज्येष्ठ वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

डीडी इंजिनिअरिंगने मुंबई महानगर पालिकेला सीएसएमटी येथील पूल धोकादायक नसल्याचा अहवाल दिला होता. तरीदेखील हा पूल कोसळला. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी वरिष्ठ वकील सुजय कांटावाला यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. येत्या २ एप्रिलला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पूल

मुंबईतील टाईम्स ऑफ इंडिया इमारत आणि सीएसटी स्टेशनला जोडणारा हिमालय पूल १४ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कोसळला. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण गंभीर जखमी झाले होते. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन सुरुवातीला या घटनेची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. मात्र, नंतर पालिकेने या पुलाच्या मेंटेनन्सची जबाबदारी स्वीकारली. तसेच डीडी इंजिनिअरिंग या कंपनीद्वारे या पुलाचे ऑडिट केले होते. त्यांनी हा पूल पूर्णतः बरा असून छोट्या-मोठ्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, असे सांगितले. त्यामुळे आज या पूल दुर्घटनेबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Intro:डीडी इंजीनियरिंगने ऑडिट रिपोर्ट मध्ये सीएसएमटी येथील पडलेला ब्रीज धोकादायक नसल्याचा अहवाल मुंबई महानगर पालिकेला दिला होता, तरी सुद्धा हा ब्रिज कोसळला कसा ? असा सवाल करीत या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे Body:14 मार्च 2019 मुंबईतील रोजी टाइम्स ऑफ इंडिया बिल्डींग आणि सीएसटी स्टेशन ला जोडणारा हिमालय ब्रिज संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कोसळला होता ज्यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता तर 36 लोकांना गंभीर जखमी झाले होते. मुंबई महानगरपालिका , रेल्वे प्रशासन सुरुवातीला या घटनेची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते त्यानंतर महानगरपालिकेने या ब्रिजच्या मेंटेनन्सची जबाबदारी स्वीकारली हे कबूल केलं आणि डीडी इंजिनीयरिंग या कंपनीद्वारे ऑडिट करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये हा ब्रिज पूर्णतः बरा असून छोट्या-मोठ्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या होत्या.आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद वरिष्ठ वकील सुजय कांटावाला यांचे मार्फत ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून. येत्या २ एप्रिल रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.