ETV Bharat / state

ATS Chargesheet: 2047 पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा कट, एटीएसच्या चार्जशिटमध्ये उल्लेख

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. पीएफआय संघटनेच्या कारवाईबाबत कोर्टात 600 पानांचे चार्ज शीट दाखल करण्यात आले आहे.

PFIs Conspiracy
इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा पीएफआयचा कट
author img

By

Published : Feb 9, 2023, 11:40 AM IST

मुंबई: 2047 वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षापर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे मनसुबे पीएफआय संघटनेचे होते. असा गंभीर आरोप या चार्जशीट मधून करण्यात आला आहे. 2047 भारत देशा शिरिया कायद्यानुसार चालला पाहिजे. यासाठी पीएफआय संघटनेकडून आखणी सुरू करण्यात आली होती. याबाबत मुस्लिम तरुणांना ट्रेन करण्याचे काम पेपर संघटनेकडून सुरू असल्याचे एटीएसने आपल्या चार्ज शीट मध्ये म्हटले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी सिमी संघटनेवर अशाच कारणांमुळे बंदी घालण्यात आली होती. सिमी संघटनेप्रमाणेच पीएफआय संघटना देखील काम करत असल्याचे एटीएसने चार्जशीटमध्ये म्हंटले आहे.

न्यायालयात चार्जशीट दाखल: गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एटीएसकडून पीएफआय संघटनेवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रासहित देशाच्या इतर राज्यातही पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती. याबाबत एटीएसने न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. तसेच मुस्लिम समाजातील मुलगी आणि हिंदू समाजातील मुलाचे लग्न लावण्याबाबत या ग्रुपच्या सदस्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चॅटिंग सुरू होते. देशात मुस्लिम समाज वाढावा यासाठी याबाबत योजना आखली जात असल्याचा उल्लेख ही या चार्जशीट मध्ये करण्यात आला आहे.

तरुण पीएसआय संघटनेत सामील: तरुणांची माती भडकवणारी भाषण, व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पीएफआय संघटनेकडून पसरवले जात होते. त्यामुळे अनेक तरुण पीएसआय संघटनेत सामील व्हायला सुरुवात झाली होती. पीएफ संघटनेचे जे संशयित सदस्य ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या मोबाईल मधून अनेक संशयास्पद आणि महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. ज्यामध्ये 2047 पर्यंत भारत देशात इस्लामिक कायदा लागू करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला आहे. पीएफआय संघटनेच्या माध्यमातून काही सदस्यांना घातक शस्त्र चालवण्याचे ट्रेनिंगही देण्यात आली. असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

पीएफआय संघटनेची स्थापना: 2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात एटीएसने पीएफआय संघटनेवर कारवाई केली होती. महाराष्ट्रात पुणे, नाशिक येथे पीएफआय संघटनेच्या कार्यालयावर कारवाई करत तेथील काही सदस्यांना एटीएसने ताब्यात घेतले होते. देश विरोधी कारवाई सारखे गंभीर आरोप यावेळी पीएफआय संघटनेवर ठेवण्यात आले होते. 1993 साली पीएफआय संघटनेची स्थापना झाली होती. याआधीही समाजात दहशतवाद, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याच्या आणि 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या आपल्या अजेंडाचा एक भाग म्हणून, पीएफआयने सर्व्हिस टीम किंवा किलर स्क्वाड नावाच्या गुप्त संघांची स्थापना केली होती. याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेने खुलासा केला होता.

हेही वाचा: Whale vomit पाऊणे सहा कोटींच्या व्हेल माशाची उलटी जप्त तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.