मुंबई : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो.
इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदूस्तान पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहिशा प्रमाणात झळ ही पोहोचणार आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये 89 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 26 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 108 रुपये 32 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 29 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे काहीशा प्रमाणात जास्त आसतात.
हेही वाचा : Today Petrol Diesel Rates : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या तुमच्या खिशाली किती कात्री लागणार