मुंबई - सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपला विरोध होऊ लागला आहे. या अॅपवर बंदी घाला, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईत राहणाऱ्या हिना दरवेश या महिलेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे टिक-टॉक हे सोशल माध्यमांवरील साधन समाजात वाईट प्रवृत्ती पसरवत असून नव्या पिढीसाठी घातक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत, आज फैसला होण्याची शक्यता
काय आहे टिक टॉक -
टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन आहे. या अॅपच्या मदतीने स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. 'बाईट डान्स' नावाच्या चिनी कंपनीने 2016 ला हे अॅप लाँच केले आहे. या अॅपची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत हे अॅप सर्वाधिक डाऊनलोड झाले आहे.
हेही वाचा - औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांनी पाकीटमारास रंगेहात पकडले
महत्वाचे म्हणजे, 13 वर्षांवरील व्यक्तीनेच टिक-टॉक अॅप वापरावे, अशी कंपनीची अट आहे. कॉमन सेन्स मीडियाच्या मते, टिक-टॉकवरील कंटेट पाहता 16 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तीनेच हे अॅप वापरणे योग्य आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.