मुंबई Petition Against Police Inspector: संतोष गिरी गोसावी हे महाराष्ट्र पोलीस विभागात 1998 पासून कार्यरत आहेत. ते कर्तव्यावर जिल्हा सोलापूर, बार्शी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. (Mumbai High Court) महाराष्ट्र शासनाचा 2005 चा छोटे कुटुंब कायदा नुसार दोन पेक्षा जास्त मुलं जर सरकारी नोकरांना झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. या पोलीस निरीक्षकांवर आरोप आहे की, त्यांना आधी दोन मुली होत्या आणि पुन्हा त्यांना तिसरं मूल झालं. ही बाब याचिकेमध्ये मांडण्यात आलेली आहे.
आधी दोन मुली, 2010 ला मुलगा जन्मला: याचिकेमध्ये आरोप करण्यात आलेला आहे की, पोलीस निरीक्षकांना तीन मुले आहेत. त्यापैकी प्रथम अपत्य नयन संतोष गिरी गोसावी (1996), द्वितीय मुलगी संस्कृती संतोष गिरी गोसावी (1999), तर मुलगा अर्जुन संतोष गिरी गोसावी (2010) आहे.
ही बाब कायद्याला अमान्य: याचिकाकर्त्यांचं मूळ म्हणणं असं की, 2005 अधिनियमाच्या कलम तीन नुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असेल तर कायद्यानुसार ते अमान्य करण्यात आले. संबंधित पोलीस निरीक्षक सध्या सेवेत आहेत आणि 2005 नंतर त्यांना तिसरं मूल जन्माला आलेलं आहे. त्यापैकी त्यांनी संस्कृती गिरी गोसावी ह्या पाल्याचा त्याग करून ते दत्तक दिल्याचं सांगितलेलं आहे. उद्या अनेक सरकारी नोकरीत काम करणारे नोकर मुलाच्या हव्यासापोटी दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घालतील आणि दत्तक दिल्याचं सांगतील, हे कायद्याला मान्य नाही.
यामुळे अनेकांना गमवावी लागली नोकरी: यासंदर्भात वकील तृणाल टोणपे यांनी सांगितलं की, महाराष्ट्र शासनाचा 'छोटे कुटुंब अधिनियम 2005' त्यातील नियमानुसार पती-पत्नी आणि दोन मुलं याच्यापेक्षा जर अधिक मुले जन्माला आले, तर सरकारी सेवेमधून बडतर्फ करण्यात येतात. 28 मार्च 2005 मध्ये स्वाती खुशालराव जोगदंड यांना 'सरकारी नोकरी नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979'द्वारे बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे सदर पोलीस निरीक्षक यांच्यावर देखील या नियमानुसार कारवाई होऊ शकते. उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी आणि कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा:
- MP High Court : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी पतीकडून पत्नीला हवयं मुल, जामिनासाठी हायकोर्टात याचिका
- Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगितीचा निर्णय राजकीय दबावापोटी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
- Mumbai HC On Development Works : शिंदे फडणवीस शासनाने विकास कामांना दिलेली स्थगिती उच्च न्यायालय उठवणार?