ETV Bharat / state

घरात मानसिक त्रास, बाहेर चोरट्यांचा हल्ला; राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट - ज्येष्ठ नागरिकांचे होताहेत हाल

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेच्या (एनसीआरबी) च्या अहवालातून समोर आली आहे. राज्यात २०१९ या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसोबत तब्बल ६ हजार १६३ अत्याचाराच्या घटना घडल्याप्रकरणी गुन्हे नोंद झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट
ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट
author img

By

Published : Oct 8, 2020, 8:17 PM IST

मुंबई - कुठे प्रॉपर्टीवरून, कुठे पेन्शनसाठी तर कुठे मालमत्तेच्या वाटणीवरून ज्येष्ठ नागरिकांना घरात मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते. समवयस्क लोकांबरोबर मन हलकं करण्यासाठी घराबाहेर पडावं म्हटले तर चोरांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा त्रास सहन करावा लागतो. या दुहेरी कचाट्यात राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती 'ना घर का, ना घाट का' अशी दुर्दैवी झाल्याचे चित्र आहे. वृद्धांना विविध घटकांकडून 'सॉफ्ट टार्गेट' म्हणून लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेच्या (एनसीआरबी) च्या अहवालातून समोर आली आहे. राज्यात २०१९ या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसोबत तब्बल ६ हजार १६३ अत्याचाराच्या घटना घडल्याप्रकरणी गुन्हे नोंद झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

वर्ष अत्याचाराची प्रकरणे

2017 5321

2018 5961

2019 6163

अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या समस्या समजून घेऊन सरकारने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नाशिकमधील काही वृद्धांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, वृद्धांवर घरात होणाऱ्या अत्याचारांपासून मुक्तता करण्यासाठी सर्वप्रथम उपाय योजले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिक काही ठराविक वेळांमध्येच घराबाहेर पडत असतात, त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून हल्ले करून चोरीच्या घटना घडतात, अशा वेळा लक्षात घेऊन त्यादरम्यान पोलिसांनी रस्त्यावरील गस्त वाढवली पाहिजे. जवळपास सर्वच वयोवृद्धांना बँकांमध्ये जावे लागते, तेथे त्यांची कामे लवकर होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

वयोवृद्ध महिलांना त्यांच्या आवडीची दागिने घालणेही मुश्कील झाले आहे. वृद्ध महिलांना हेरून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 'चेन स्नॅचिंग' केल्याच्या कित्येक घटना राज्यात घडल्या आहेत.

पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न

राज्यातील पोलीस दल ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा देण्याचे काम करत असले तरीही अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. वृद्धांच्या समस्या एकूण घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ज्येष्ठ नागरिक डेस्क' तयार केला आहे. वेळो-वेळी ज्येष्ठांच्या भेटी घेणे, त्यांची आस्थेने विचारपूस करणे यासह त्यांना काय हवे आणि कशाची गरज आहे, त्यांना कुणी त्रास तर देत नाही ना याची नागपूर पोलीस चौकशी करतात. नागपुरात चालू वर्षात जेष्ठ नागरिकांच्या तक्रारींच्या संख्येत घट झाली असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या 'भरोसा सेल'कडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - डाळीला महागाईचा 'तडका'; येत्या काही दिवसांत आणखी दर वाढण्याची चिन्हे

नागपूर शहरातील नोंदणीकृत ५६६३ ज्येष्ठ नागरिकांना पोलीस विभागाकडून विशेष प्रकारचे कार्ड दिलेले आहे. या शिवाय हजारो ज्येष्ठ नागरिक पोलिसांच्या थेट संपर्कात आहेत. भरोसा सेलकडून दर दिवसाला २५ ते ४० ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांची खुशाली जाणून घेतली जाते. सुमारे २०० ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याची जबाबदारी ही खुफिया विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

याच पद्धतीने मुंबईतही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कार्यरत आहेत. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर ४० हजार ज्येष्ठ नागरिक हे नोंदणीकृत आहेत. ९३ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती ठेवण्यास सांगण्यात आले असून या ज्येष्ठ नागरिकांना आणि खास करून घरी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असल्यामुळे त्यांना गरजेचे साहित्य सूचना मिळाल्यानंतर घरपोच केले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी १९४० हा मदत क्रमांक महानगरपालिकेने सुरू केला आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : गच्चीवरील भात शेतीचा यशस्वी प्रयोग; कोल्हापूरच्या अवलियाने साधली किमया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.