ETV Bharat / state

Wazes witness application : सचिन वाझे यांच्या माफीच्या साक्षीदाराच्या अर्जाला ईडीकडून परवानगी - सचिन वाझे

100 कोटी कथित वसुली प्रकरणात (100 crore alleged recovery case) ईडी कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्हा मध्ये आरोपी असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार (Sachin Wazes apology witness application ) होण्याकरिता ईडीने परवानगी दिली (Permission from the ED) आहे. वाझे यांच्याअर्जावर ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात उत्तर सादर केले. यात परवानगी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Sachin Waze
सचिन वाझे
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:56 PM IST

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या विरोधात ईडीने आर्थिक व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला या प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेले अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी आहेत. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातही सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार केले आहे. गुन्ह्याबाबत असलेली सर्व माहिती व प्रत्येक आरोपीची त्यातील भूमिकेविषयी स्पष्ट व खरी माहिती देण्याची अट वाझेला घालण्यात आली आहे.

तपासादरम्यान जमा केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुरावे व वाझे याने दिलेला जबाब हे एकमेकांची पुष्टी करत आहेत. काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा आहे. वाझेने देशमुखांचा साथीदार म्हणून काम केले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे ईडीने वाझेच्या अर्जावर उत्तर देताना म्हटले आहे. वसुलीद्वारे आलेल्या पैशांवर देखरेख व ते देशमुखांकडे सोपवण्याची पालांडे व शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती वाझेला होती. देशमुख 100 कोटी वसुलीच्या कटातील मुख्य सूत्रधार आहेत असे ईडीने उत्तरात म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने 9 जून रोजी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यावर उत्तर दाखल केले. विशेष न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी 21 जुलै रोजी ठेवली आहे. संबंधित गुन्ह्यांत आरोपीची भूमिका व अन्य आरोपींची भूमिका आरोपीने स्पष्ट करण्याच्या अटीवरच त्याचा माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज मंजूर करण्यास तपास यंत्रणेला हरकत नाही.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा : Shiv Senas letter to the Governor: तो पर्यंत मंत्रीपद अथवा कोणत्याही नियुक्त्या करु नका शिवसेनेचे राज्यपालांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.