ETV Bharat / state

गर्दी कमी करण्यासाठी भुयारी मार्गातील फेरीवाले हटवले - मुंबई महानगरपालिका

कोरोनाचे महाराष्ट्रात 42 तर मुंबईत 15 रुग्ण आहे. मुंबईत एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून आयुक्तांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गांमधील फेरीवाल्यांना हटवले आहेत.

Corona Virus
कोरोना न्यूज
author img

By

Published : Mar 18, 2020, 2:55 PM IST

Updated : Mar 18, 2020, 3:15 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी पालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गांमधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी फेरीवाल्यांना हटवले आहेत.

भुयारी मार्गातील फेरीवाले हटवले

कोरोनाचे महाराष्ट्रात 42 तर मुंबईत 15 रुग्ण आहे. मुंबईत एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून आयुक्तांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालया दरम्यान असलेल्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

हेही वाचा - १०० वर्षातून अशी महामारी येतेच; कलियुगात व्हायरसचा सामना करणं अशक्य'

या ठिकाणी दुकाने आणि फेरीवाले असल्यामुळे ही गर्दी वाढण्यास मदत होते. ही गर्दी कमी व्हावी म्हणून पालिका आयुक्तांनी 'साथ रोग नियंत्रण कायद्या'नुसार दिलेल्या अधिकाराचा वापर करत भुयारी मार्गातील फेरीवाले हटवले आहेत. यामुळे भुयारी मार्ग मोकळा झाला असून त्याठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी कमी झाली आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.