ETV Bharat / state

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला आ.विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता.

शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
author img

By

Published : Jun 16, 2021, 12:11 AM IST

नवी मुंबई- शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यातील ते प्रमुख आरोपी आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखा परिमंडळ-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी, त्यांच्या पनवेल येथील आस्वाद निवासस्थानावरून त्यांना अटक केली आहे.

शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून २९ कोटींचा घोटाळापनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला, आ. विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेवीदारांच्या ५२९ कोटींच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.
शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक
रिझर्व्ह बँकेला कर्नाळा बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनासरिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने, त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखापरिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्णतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटींवर गेला आहे.सी आय डीच्या माध्यमातून वाहने जप्तकर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांनी विवेक पाटील यांच्यासह अभिजित पाटील यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती. कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता. त्यानुसार आज मंगळवारी (ता. १५) रोजी सुनील कुमार यांनी विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील आस्वाद निवासस्थानातून अटक केली आहे. कर्नाळा बँकेचा आर्थिक गुन्हे शाखा स्वतंत्र्यरित्या तपास करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-कर्नाळा बँकेच्या 520 कोटींच्या घोटाळ्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे - भाजप आमदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.