ETV Bharat / state

काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !

author img

By

Published : Nov 12, 2019, 2:36 AM IST

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली.

पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली. शिवसेना नेत्यांनी सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुदतवाढ मागितली, पण राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आजची ऐतिहासिक भेट निष्फळ ठरली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगाबाबत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 'आम्ही काँग्रेससोबत बसून तोडगा काढत असून निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात वांद्र्यातील हॉटेल ताज लँड येथे बैठक पार पडली. यावेळी पवार व ठाकरेंमध्ये जवळपास २० मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर व सर्व पर्यायांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे समजते.

बैठकीनंतर शिवसेनेला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी सोमवारी ७ वाजून ३० मिनिटापर्यंतची वेळ दिली होती. मात्र काँग्रेसने आपण उद्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे पत्र जारी केले. त्यामुळे पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट निष्फळ ठरली आहे.

Intro:काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !

mh-mum-01-thakare-pavar-meet-7201153

(फाईल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. ११ :

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणारे काँग्रेसचे लेखी पत्र सोमवारी सायंकाळपर्यंत न आल्यामुळे शिवसेनेच्या पाठबळ न मिळाल्याने कोंडी झाली. यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आजची ऐतिहासिक भेट निष्फळ ठरली.

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगाबाबत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आघाडीने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयानंतरच सेनेला सत्ता स्थापण्याबाबतचा आपला निर्णय राष्ट्रवादी जाहीर करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्याच दरम्यान शरद पवार हे चव्हाण सेंटर येथून बाहेर पडले. ते वांद्रे येथील ताज लँड एंड हॉटेलमध्ये पोचले. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्री या आपल्या निवासस्थानातून हाॅटेलवर पोचले. ताज लँड एंड हॉटेलमध्ये पवार आणि ठाकरे यांच्यात ४५ मिनीटे बंद दाराआड चर्चा झाली.
यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा सरकार स्थापनेचा प्रस्ताव ऐकून घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल, असा शब्द पवार यांनी ठाकरे यांना दिल्याचे समजते. दोन्ही काँग्रेसचा निर्णय एकत्रित होईल, असेही पवार यांनी या भेटीत सांगितले. तर सत्ता स्थापनेसाठी पाठींबा देण्याची उद्धव ठाकरे यांनी पवार यांना भेटीदरम्यान विनंती केली. ती पवार यांनी तत्वत: मान्य. मात्र, संध्याकाळपर्यंत काँग्रेस नेते याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी उद्धव यांना सूचित केले. दोघा नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कळीच्या प्रश्नावर एकत्र काम करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यास टाळले.पवार परत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोचले. तेथे राष्ट्रवादीच्या नेत्याची पुन्हा बैठक झाली. तिकडे दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत काय होते, याचा आदमास घेत शरद पवार रात्री उशिरपर्यंत चव्हाण सेंटर मध्ये आपल्या नेत्यांसह बसून होते. तिकडे सेनेचे शिष्टमंडळ काँग्रेसच्या पाठिंब्या च्या पत्राची एक तासाहून अधिक वेळ वाट पाहत राहिले मात्र हे पत्र आलेच नाही. उलट काँग्रेसने आपण उद्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे पत्र जारी केले, यामुळे दिवसभरात पवार - ठाकरे यांच्या भेटीने राज्यात निर्माण झालेल्या वातावरणावर पाणी फेरले गेले.

Body:काँग्रेसच्या दिरंगाईने पवार-ठाकरे यांची ऐतिहासिक भेट ठरली निष्फळ !Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.