ETV Bharat / state

मुंबई : पवनधाम कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती - Guardian minister aslam shaikh on Covid center

केंद्र सरकारच्यावतीने रेमडेसिविर इंजेक्शन योग्यरित्या नियोजन केले असते तर अशा पद्धतीने तुटवडा झाला नसता. निर्यातबंदी करून देखील योग्यरीत्या नियोजन करून सर्व राज्यांना दिले पाहिजे.

Guardian minister aslam shaikh
पालकमंत्री अस्लम शेख
author img

By

Published : Apr 25, 2021, 4:34 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर बनवविण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये आगीच्या घटना वाढत त्यासाठी काही नियम कडक करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्व परवानगी काढून सेंटर सुरू करण्यासाठी देत आहेत अशाच प्रकारे सर्व मंदिर, मशीद जागा रुगांच्या सेवेसाठी पुढे येत आहेत. लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. मात्र, पवनधाम कोविड सेंटर उद्यापासून नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू होणार, असे अस्लम शेख यांनी सांगितले

केंद्र सरकारच्यावतीने रेमडेसिविर इंजेक्शन योग्यरित्या नियोजन केले असते तर अशा पद्धतीने तुटवडा झाला नसता. निर्यातबंदी करून देखील योग्यरीत्या नियोजन करून सर्व राज्यांना दिले पाहिजे. एकीकडे काही राज्यांमध्ये त्याठिकाणच्या राजकीय पक्षांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते, अशा घटना वारंवार समोर आलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या सगळ्यांचे योग्यरित्या नियोजन करण्यात यावे, अशीदेखील मागणी पालकमंत्री असलम शेख यांनी केली.

राज्याची ताकद संपल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना मदत करणं अत्यंत गरजेचे आहे कारण की लोकांचे जीव वाचवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हे लोकांना मदत करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.