ETV Bharat / state

रेल्वे ठप्प झाल्यास एमटीआरसी प्राणालीतून प्रवाशांना मिळणार रियल टाइम माहिती - MTRC System

लोकल ट्रेनमधून प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना येत्या काळात रियल टाइम माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

Railways
रेल्वे
author img

By

Published : Feb 12, 2021, 12:30 AM IST

मुंबई - लोकल ट्रेनमधून प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना येत्या काळात रियल टाइम माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन (एमटीआरसी) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा रेल्वे खोळंबा झाल्यास प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकातील बदलांबाबत अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

माहिती देताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर

हेही वाचा - विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार - अजित पवार

5 कोटी रुपयांचा खर्च

या एमटीआरसी यंत्रणेमुळे कंट्रोल रूम आणि लोकांमध्ये संवाद समन्वय साधण्यात मदत होणार आहे. ही यंत्रणा प्रामुख्याने मेट्रो आणि मोनो रेल्वेच्या कंट्रोल रूमच्या धर्तीवर पश्चिम रेल्वे मार्गावर बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेला पाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच, या एमटीआरसी यंत्रणेचा फायदा मोटरमन आणि रेल्वेच्या कंट्रोल रूममध्ये असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचले किंवा लोकल जागीच थांबली की त्यामुळे प्रवास खोळंबतो, अशावेळी लोकलमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

वेळेची होणार बचत

रेल्वे रुळाला तडा गेल्यास किंवा ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यास लोकलच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजते. त्यानंतर वाहतूक कधी सुरू होईल याची माहिती रेल्वे प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे, प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. जेव्हा लोकल गाड्या रेल्वे मार्गावर धावतात. तेव्हा मोटरमन यांचे मोबाईल बंद असतात. त्यामुळे, जेव्हा लोकल गाडी बंद पडली किंवा कोणती घटना घडली त्या वेळेस मोटरमन कर्मचाऱ्यांना मोबाईल सुरू करून कंट्रोल रूमशी संवाद साधावा लागतो. यात वेळ जातो. आता ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता पश्चिम रेल्वेने आपल्या प्रत्येक लोकलमध्ये एमटीआरसी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

काय आहे ही प्रणाली?

ही यंत्रणा अत्याधुनिक असल्याने लोकल नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मोबाईल अ‌ॅपवर मिळणार आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या 120 किलोमीटर अतरात ही यंत्रणा कार्यरत असेल. या यंत्रणेसाठी रेल्वेला पाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा - जनताच ठाकरे सरकारचा घमंड उतरवेल - आशिष शेलार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.