ETV Bharat / state

कोरोना खबरदारी : परदेशातून आलेल्या प्रवाशांना घाटकोपरमध्ये ठेवू नका, भाजप आमदाराची मागणी - कोरोना मुंबई बातमी

घाटकोपर सारख्या गजबजलेल्या वस्तीत परदेशातून आलेल्या प्रवाशांना ठेवणे घातक आहे. त्या प्रवाशांना मुंबईच्या बाहेर, लोकवस्ती कमी असणाऱ्या जागेत सुरक्षित ठेवावे, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली.

कोरोना खबरदारी
कोरोना खबरदारी
author img

By

Published : Mar 13, 2020, 9:43 PM IST

मुंबई - देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात हा आकडा आता १७ वर पोहोचला आहे. खबदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सूचनांनुसार परदेशातून आलेल्यांना घाटकोपर इथल्या नौदलाच्या डेपोत स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत आहे. मात्र, या गजबजलेल्या वस्तीत संशयित रुग्णांना ठेवू नये अशी मागणी भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केली आहे.

परदेशातून आलेल्या प्रवाशांना घाटकोपर इथल्या डेपोत ठेवू नये, भाजप आमदार राम कदम यांची मागणी

विधानसभेत माहिती देताना कदम म्हणाले, घाटकोपर, टिळक रोड इथल्या नीलकंठ विहार या सोसायटीत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला असल्याने परिसरात अधिकच भीतीचे वातावरण आहे. जर या परिसरात परदेशी प्रवाशांना ठेवण्यात येत असल्याची माहिती परिसरात पसरल्यास स्थिती अधिकच गंभीर होऊ शकते. त्याचप्रमाणे घाटकोपर सारख्या गजबजलेल्या वस्तीत परदेशातून आलेल्या प्रवाशांना ठेवणे घातक आहे. त्या प्रवाशांना मुंबईच्या बाहेर, लोकवस्ती कमी असणाऱ्या जागेत सुरक्षित ठेवावे, अशी मागणी कदम यांनी केली. त्याचबरोबर मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - कोरोना व्हायरस: सुट्टी जाहीर नाही... 'ते' परिपत्रक खोटे!

यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, खासगी रुग्णालयांना केंद्राच्या परवानगीशिवाय कोरोना चाचणी करण्याची परवानगी देता येणार नाही. केंद्राने परवानगी द्यावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्राने आवश्यक परवानगी देऊन चाचण्यांचे किट पुरवल्यास आणखी काही ठिकाणी चाचण्यांना परवानगी देता येईल, असेही पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - मुंबईत आढळला आणखी एक कोरोना संशयित, कस्तुरबा रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.